Indian bride bald look : लग्न हा प्रत्येक तरुणीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो त्यामुळे या दिवशी आपण सर्वात सुंदर दिसावे असे तरुणीला वाटते. लग्नामध्ये ड्रेस, मेकअप किंवा हेअरस्टाईल सर्वकाही नववधूला परफेक्ट हवे असते. सुंदर दिसणे, चांगले कपडे परिधान करणे आणि लग्नात फॅन्सी हेअरस्टाईल करणे म्हणजे सुंदरता अशी व्याख्या वर्षानुवर्षांपासून समाजात रुजलेली आहे ज्यामुळे अनेक मुलींना संघर्ष करावा लागतो. पण एका धाडसी तरुणीने सौंदर्याची ही व्याख्याचा बदलून टाकली आहे. या नववधूने लग्नात चक्क टक्कल केले आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. एका भारतीय वधूने तिच्या लग्नाच्या दिवशी केसांचा विग न वापरता स्वत:चे नैसर्गिक टक्कल स्वीकारत लग्न केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेत राहणारी कंटेंट क्रिएटर नीहर सचदेवा हिने तिच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक तरुणींनी प्रेरणा देत आहे. अलोपेसियाचे निदान झालेल्या नीहरच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

अलोपेशियाचे निदान झालेल्या नवरीने उचलले धाडसी पाऊल

अलोपेशिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे केस गळतात, ज्यामुळे अनेकदा टाळूवर टक्कल पडते. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती चुकून केसांच्या कूपांवर हल्ला करतात, ज्यामुळे केस गळतात तेव्हा ही स्थिती उद्भवते.

टक्कल स्वीकारून केले लग्न

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नीहरने सुंदर लाल लेहेंगा आणि स्टेटमेंट ज्वेलरी परिधान केली आहे. तिच्या डोक्यावर कोणताही केसांचा वीग लावलेला दिसत नाही उलट टक्कल केलेला असूनही ती अत्यंत आत्मविश्वासाने तिचा भावी पती अरुण व्ही गणपतीयाच्याकडे चालत जाताना दिसते. तो तिच्याकडे अत्यंतप्रेमाने पाहत आहे. दोघांच्या वरमाला समारंभाच्या आधी ते एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहे. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी दाडले आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

नीहरच्या लग्नातील आणखी काही फोटो येथे आहेत.

नीहरने सांगितला तिचा प्रवास

शिवानी पौ बरोबर केलेल्या पॉडकास्टमध्ये बोलताना नीहरने तिचा प्रवास आणि तिच्या आजाराचा तिच्या बालपणावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “कधीकधी, माझ्या डोक्यावर केस असायचे पण नंतर माझी एक भुवयांवरील केस गळून पडायचे खूप दिवसांपासून, माझे सर्व केस होते पण माझ्याकडे फक्त भुवया नव्हत्या आणि तेव्हा मी कदाचित ५, ६, ७ वयोगटात होते. मी नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात चांगली होते आणि मला वाटते की,”जेव्हा मी विग घालायला सुरुवात केली तेव्हा माझे गुण कमी झाले कारण आता मी वर्गात लक्ष देत नव्हते. मी ‘माझ्या केसांचा मागचा भाग ठीक आहे का?’ किंवा ‘मला माझा विग इथे खाली खेचण्याची गरज आहे का?’ यावर लक्ष देत होते. विग घालणे हा माझ्यासाठी पर्याय नाही. मी कोणताही वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही आणि म्हणून मी माझे डोके मुंडण्याचा निर्णय घेतला आणि हा कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता,” नीहर म्हणाली.

नीहर सचदेवाचे इंस्टाग्रामवर २१,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bride with alopecia ditches wig embraces bald look emotional wedding video snk