नंबर प्लेटसाठी भारतीय व्यावसायिकाने मोजले ६० कोटी

व्हीआयपी नंबर प्लेट दुबईत श्रीमंतीचे लक्षण मानतात

२००९ मध्ये सहानी यांनी ४८ कोटी रुपये मोजून नंबर प्लेट खरेदी केली होती.

गाडीच्या नंबर प्लेटसाठी तुम्ही किती रुपये मोजाल ? पाचशे, हजार, दोन हजार ? चला फार फार तर पाचएक हजार मोजाल. पण तुम्हाला कदाचित ऐकून आर्श्चय वाटेल की एका माणसाने गाडीच्या नंबर प्लेटसाठी चक्क ६० कोटी रुपये मोजले आहे. दुबईत राहणा-या एका भारतीय व्यवसायिकाने आपल्या रोल्स रॉईस या आलिशान गाडीसाठी तब्बल ६० कोटींची नंबर प्लेट एका लिलावातून खरेदी केली आहे. दुबईमध्ये गाडीवर एक अंकाची नंबर प्लेट असणे हे स्टेटस सिम्बल मानले जाते. एक आकडी नंबर प्लेट असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण मानले म्हणूनच एका व्यवसायिकाने तिच्यासाठी ६० कोटी रुपये मोजले आहेत. बलविंदर सहानी असे या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांची दुबईत प्रॉपर्टी मॅनेजमेंटची कंपनी आहे. व्हिआयपी नेमप्लेटच्या एका लिलावत त्यांनी ‘D5’ ही व्हिआयपी नेमप्लेट ३३ मिलिअन दिरहाम मोजून खरेदी केली आहे. याआधीही २००९ मध्ये सहानी यांनी ४८ कोटी रुपये मोजून नंबर प्लेट खरेदी केली होती. गेल्याच आठवड्यात रस्ते वाहतूक कार्यालयाकडून व्हीआयपी नंबर प्लेटचा लिलाव करण्यात आला होता. यात जवळपास ८० नंबर प्लेटचा लिलाव करण्यात आला. लिलावातून जमलेली रक्कम ही दुबईच्या रस्ते वाहतूक विभागाकडे जमा होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian businessman buys dubai licence plate for rs59 9 crore for his rolls royce

ताज्या बातम्या