scorecardresearch

Viral Video: धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला हातरुमालाच्या खेळात फुटला घाम, या तरुणीनं केला दारुण पराभव

क्रिकेटच्या मैदानाबाहेर एका तरुणीने श्रेयस अय्यरचा या खेळात दारुण पराभव केला, व्हिडीओ झाला व्हायरल.

Viral Video: धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला हातरुमालाच्या खेळात फुटला घाम, या तरुणीनं केला दारुण पराभव
एका तरुणीने या खेळात श्रेयस अय्यरचा पराभव केला. (image-graphics team)

Shreyas iyer viral video: भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करताना दिसतो. चौकार-षटकारांची वादळी खेळी करणाऱ्या अय्यरचाही एका खेळात दारुण पराभव झाला आहे. एरव्ही चेंडू सीमापार करणाऱ्या श्रेयसला या खेळात एका तरुणीने चांगलाच घाम फोडला. इन्स्टाग्राम स्टार रुही दोसानीनं श्रेयससोबत हातरुमाल पकडण्याचा खेळ खेळला. पण या खेळात श्रेयसला ना बॅटने खेळता आलं ना चेंडूनं…त्यामुळे श्रेयसला हातरुमाल पकड्याचा खेळ जरा अवघडचं वाटला असावा. कारण रोजच्या क्रिकेटच्या सरावामुळं हातरुमालाचा खेळ खेळायला श्रेयसला फावळा वेळच मिळाला नसेल, असं नक्कीच म्हणता येईल. या दोघांमध्ये हातरुमाल पकड्याच्या खेळाचा रंगतदार सामना झाला. दोघांच्यात झालेली स्पर्धा कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रुही आणि श्रेयसच्या हातरुमाल पकडण्याच्या खेळात लगान चित्रपटातील संकल्पनेचा वापर केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. अभिनेता आमिर खानच्या लगान चित्रपटातील वेशभुषेप्रमाणे श्रेयसनेही तशाच प्रकारचं पेहराव केल्याचं व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. फरक एव्हढाच आहे की, लगान चित्रपटात क्रिकेटचा सामना रंगला होता आणि या दोघांमध्ये हातरुमालाच्या खेळाची स्पर्धा झाली. या खेळात दोन्ही स्पर्धक एका सर्कलमध्ये ठेवलेल्या हातरुमालाला पकडण्याचा प्रयत्न करतात. जो हातरुमाल आधी उचलेल आणि विरोधी स्पर्धकाला चकवा देऊन आपल्या संघाजवळ पोहोचेल, तोच या खेळात विजयी स्पर्धक असतो. या व्हिडीओतही या दोघांनी रंगतदार खेळ खेळला असल्याचं पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Viral Video: जपानमध्येही ‘बेशरम रंग’ गाण्यानं घातलाय धुमाकूळ, जपानच्या तरुणीचा डान्स पाहून गायिका शिल्पा रावने दिली भन्नाट प्रतिक्रिया

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला लगान चित्रपटातील ‘चले चलो’ गाणं सुरु होतं. रुहीने हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर करून ‘लगान २.०’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला ३.६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने नेटकरी या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत. रुहीने सर्वात आधी हातरुमाल उचलून श्रेयसला चकवा देत विजय संपादन केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. श्रेयसनंही हातरुमाल पकडण्याच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी कंबर कसली पण त्याला या खेळात जिंकता आलं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 14:27 IST

संबंधित बातम्या