Bullet viral video: एके काळी बुलेटचा आवाज आला की, दूधवाला आला अशीच या गाडीची ओळख होती. पण, आता या गाडीची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. स्वस्तातील फोरव्हीलरपेक्षा महाग असलेल्या या गाडीमुळे रुबाब वाढतो, असे तरुणाईचे ‘इंप्रेशन’ आहे. अशाच बुलेट प्रेमीनी भारताबाहेर शिफ्ट होण्याआधी आपल्या बुलेटलाही इंग्लंडला पोहचवलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यात काय? पण पंजाबहून इंग्लंडला रॉयल एनफील्ड बुलेट पाठवण्यासाठी भारतीय कुटुंबाने चक्क ₹४.५ लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एका पंजाबी कुटुंबाने त्यांचे फर्निचर आणि रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल भारतातून इंग्लंडमधील त्यांच्या घरी पाठवण्यासाठी ₹४.५ लाखांपेक्षा जास्त पैसे दिले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वुल्व्हरहॅम्प्टन शहरात मोटारसायकल आणि फर्निचर घेऊन जाणारा कंटेनर दिसला. हा व्हिडिओ ‘राजगुरु३६१०’ नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला होता ज्याने म्हटले होते की, भारतातून युकेला फर्निचर आणि रॉयल एनफील्ड बुलेट पाठवण्यासाठी ४,००० पौंड (अंदाजे ४.६ लाख रुपये) लागले.

बुलेट भारतातून युकेला जाते तेव्हा..

पंजाब शहराच्या क्रमांकाची नंबर प्लेट असलेली काळी रॉयल एनफील्ड बुलेट कंटेनर ट्रकमध्ये दिसली. ट्रकमधून मोटारसायकल उतरवल्यानंतर त्यावर पगडी घातलेला एक शीख पुरूष दिसला. व्हिडिओमध्ये ४० दिवसांच्या प्रवासात ४,००० पौंड खर्च करून भारतातून इंग्लंडला पाठवण्यात आलेले फर्निचर देखील दाखवण्यात आले आहे. फर्निचरमध्ये एक सोफा सेट, जेवणाचे टेबल, अनेक विंग खुर्च्या आणि बेड यांचा समावेश होता.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, राजगुरू यांनी शिपिंगच्या खर्चाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की सर्व फर्निचर आणि मोटरसायकल पाठवण्यासाठी ४,००० पौंड लागले आणि सर्व काही सुरक्षितपणे युकेमध्ये पोहोचले. त्यांनी असेही स्पष्ट केले की भारतातील करतारपूर येथून फर्निचर मागवण्यात आले होते कारण भारतीय फर्निचरची गुणवत्ता चांगली आहे. राजगुरू म्हणाले की ते आणि त्यांचे कुटुंब कायमचे युकेमध्ये स्थायिक होत आहेत. रॉयल एनफील्ड बुलेट ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित मोटारसायकलींपैकी एक आहे. पंजाबमधील एका माणसाला हजारो मैलांवरून त्याची मोटरसायकल पाठवताना पाहून मोटारसायकल उत्साही लोक रोमांचित झाले.