Funny video: सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात भारतीय इन्फ्लुएन्सर शादाब हसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हे एका लिफ्टमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्या या छोट्याशा, पण भन्नाट संवादाने नेटिझन्सना अक्षरशः खळखळून हसवले आहे. क्रिकेट आणि सोशल मीडियाच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून, ‘ह्युमर नो बाउंड्रीज’ याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

हा व्हिडीओ ब्रेट ली यांच्या भारत भेटीदरम्यान शूट करण्यात आला आहे. भारतात एका कार्यक्रमासाठी आलेल्या ब्रेट लीसोबत शादाब हसन लिफ्टमध्ये उभा होता. त्यादरम्यान अचानक शादाबनं ब्रेट लीकडे बघत हिंदीत विचारलं, “१० वाला बिस्कीट कितने का है जी?” हे ऐकताच लिफ्टमधले सगळे लोक हसू लागले. मात्र, ब्रेट ली मात्र क्षणभर गोंधळला आणि त्याच्या चेहऱ्यावर ‘काय म्हणाला हा?’ असे हावभाव स्पष्ट दिसले.

ब्रेट ली काही क्षण गोंधळून आजूबाजूला बघू लागला; पण तरीही त्यानं आपली शांतता आणि नम्रता कायम ठेवली. त्यादरम्यान लिफ्टमधील एक जण म्हणतो, “त्याची हिंदी तर आपल्यापेक्षा चांगली आहे!” हे ऐकून सगळे हसतात. शेवटी ब्रेट लीनं हसतच उत्तर दिलं, “आप सभी को थैंक यू,” त्याच्या गोड अॅक्सेंटमुळे सगळे पुन्हा हसू लागतात आणि हा प्रसंग अजूनच मजेशीर होतो.

पाहा व्हिडिओ

हा छोटासा, पण मजेशीर संवाद सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झाला. इन्स्टाग्राम आणि एक्स shadabjakati1 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १६ दशलक्षांहून अधिक व्ह्युज, सात लाखांहून अधिक लाइक्स आणि हजारो प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. अनेकांनी ब्रेट लीच्या साधेपणाचं आणि विनोदी स्वभावाचं कौतुक केलं आहे.

प्रतिक्रियांमध्ये चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “तो १० विकेट घेऊ शकतो; पण १० वाल्या बिस्कीटचं प्राईस नाही सांगू शकत.” तर, दुसऱ्यानं म्हटलं, “ब्रेट लीच्या स्माइलचं सगळं ह्युमर नेक्स्ट लेव्हलवर नेतं.” आणखी एका चाहत्यानं लिहिलं, “हीच तर इंडिया आहे – इथे क्रिकेटर असो की इन्फ्लुएन्सर, सगळं काही मजेत चालतं.”

एकंदरीत हा व्हिडीओ पुन्हा एकदा सिद्ध करतो की, हास्याला कुठल्याही भाषेची, देशाची मर्यादा नसते. क्रिकेटच्या मैदानाबाहेरदेखील ब्रेट ली आपल्या चार्म आणि हसतमुख स्वभावाने भारतीय चाहत्यांची मने जिंकताना दिसतो आहे.