Viral video: मंदिरात आपण दर्शनासाठी गेलो की चप्पल बाहेर काढून ठेवतो. पण अनेकदा दर्शन घेताना चप्पल चोरीला जाईल, याची भीती असते. त्यामुळे देवाचं दर्शन घेताना चित्त लागत नाही. कधी कधी मंदिराबाहेर आलो की, चप्पल चोरीला गेलेली असते. त्यामुळे निराश होऊन घरी यावं लागतं. मंदिर असो वा मशीद, किंवा कोणतंही प्रार्थनास्थळ… बऱ्याच वेळा अशा ठिकाणांहून चपला चोरीला जाण्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. हे तर नेहमीचंच असं समजून लोकं ते सोडून देतात आणि घरी निघून जातात. मात्र यापुढे मंदिरात जाताना चप्पलची चिंता न करता जा. कारण तरुणानं मंदिरात चप्पल चोरीपासून कसं वाचायचं? याची अनोखी ट्रिक सांगितली आहे. जर तुम्ही ही ट्रिक वापरलीत तर तुमची चप्पल कधीच चोरी होणार नाही. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आपल्याला तर हे माहित आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच या तरुणानंही भन्नाट जुगाड केला आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मंदिराबाहेर अक्षरश: चपलांचा खच पडलेला दिसत आहे. जिथे नजर जाईल तिथे चपलाच चपला दिसत आहेत. यावेळी कुठेही चपलेच्या दोन्ही जोड्या दिसत नाहीयेत, एक एकीकडे तर एक एकीकडे अशा चपला सर्वत्र दिसत आहेत. अशातच एका तरुणानं आपली चप्पल चोरी होऊ नये म्हणून एक जबरदस्त असा जुगाड केला आहे. आता तुम्ही म्हणाल तरुणानं असं केलं तरी काय? तर या तरुणानं त्याच्या दोन्ही चपला वेगवेगळ्या ठिकाणी काढून ठेवल्या. एकाच ठिकाणी जर चपलेची जोडी असेल तर ती चोरीला जाण्याची शक्यता असते मात्र या पठ्ठयाने आपली एक चप्पल एकीकडे आणि दुसरी एकीकडे ठेवली. त्यामुळे आता एक चप्पल चोरी होण्याचा प्रश्नच नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘सारे लड़को की कर दो शादी’ गाण्यावर काकांचा ‘दिल खोल के डान्स’, सोशल मीडियावर VIDEO ने घातला धुमाकूळ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rana_ka_rayta नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने चप्पल सुरक्षित असं कॅफ्शन दिलं असून नेटकरी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader