पेट्रोल, डिझेल म्हटल्यानंतर अनेकांच्या डोळ्यासमोर केवळ दरवाढीचे आकडे फिरतात. इंडियन ऑइल कॉर्परेशनने आता याच इंधनदरवाढीचा एका भन्नाट कल्पनेसाठी वापर केले. भेट वस्तू देण्याऐवजी इंधन भेट म्हणून देण्याचा पर्याय इंडियन ऑइल कॉर्परेशनने दिलं आहे. आयओसीने फ्यूएअल व्हाऊचर्सची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता आपल्या प्रियजनांच्या खास दिवसानिमित्त त्यांना रोख रक्कम किंवा इतर गोष्टी भेट देण्याऐवजी हा पर्याय आमजमावता येणार आहे. वन फॉर यू हे इलेक्ट्रीक फ्यूएअल व्हाऊचर थेट ऑनलाइन विकत घेता येणार आहे. आयओसीने यासंदर्भातील एक जाहिरात ट्विटरवरुन पोस्ट केलीय. “लग्न साजरं करण्यासाठी अगदी योग्य भेटवस्तू,” अशी जाहीरात या व्हाऊचर्ससाठी करण्यात आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुमच्या प्रियजनांच्या आयुष्याची नवीन सुरुवात आणखीन खास करा. लग्न साजरं करण्यासाठी अगदी योग्य गिफ्ट म्हणजे इंडियन ऑइलचं वनफॉरयू ई फ्यूएल व्हाऊचर. आजच विकत घ्या आणि तुमच्या प्रियजनांवर या माध्यमातून प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव करा,” अशा मजकुरासहीत या व्हाऊचरची जाहिरात करण्यात आलीय.

यापूर्वीही इंडियन ऑइलने दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या कालावधीमध्ये असाप्रकारची जाहिरात केली होती. हे व्हाऊचर्स अगदी ५०० रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

काहींना ही कल्पना आवडली आहे तर काहींनी मात्र एकीकडे लोकांना महागाईचा, इंधनदरवाढीचा फटका बसत असताना दुसरीकडे कंपन्या यामधून नफा कमवण्याचा विचार करत असल्याबद्दल टीका केलीय. अनेकांनी इंडियन ऑइलची कल्पना भन्नाट असून अगदी योग्य वेळी त्यांनी याचा वापर केलाय असं म्हटलंय. अनेकांनी केवळ इमोंजीच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात…

१)

२)

३)

४)

५)

६)

केंद्र सरकारने दिवाळाच्या कालावधीमध्ये पेट्रोलवरील करामध्ये ५ रुपये प्रती लिटर तर डिझेलवरील कर १० रुपये प्रती लिटरने कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर भाजपा आणि मित्र पक्षांची सत्ता असणाऱ्या २५ राज्यांनी त्यांच्याकडून इंधनावर आकारला जाणारा करही कमी केला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian oil promotes e fuel vouchers as perfect wedding gifts internet reacts scsg
First published on: 30-11-2021 at 18:53 IST