भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवीन ट्रेन सुरू करणार आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) २९ ऑगस्टपासून  ‘भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन्स’ सुरू करणार आहे. या टूरमध्ये  हैदराबाद, अहमदाबाद, निष्कलंक महादेव शिव मंदिर, अमृतसर, जयपूर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखी ठिकाणे आहेत. टूर पॅकेजची एकूण किंमत ११,३४० पासून सुरू होते. टूर २९ ऑगस्टपासून सुरू होउन १० सप्टेंबरला संपेल. या टूरचं बुकिंग कसं करायचं? कुठून ही टूर सुरु होईल आणि पॅकेजमध्ये काय मिळणार? याबद्दल जाणून घेऊ. पर्यटकांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट (प्रवासाच्या तारखेपूर्वी ४८ तासांपेक्षा कमी) सोबत ठेवावा.

कसं करता येईल बुकिंग?

आयआरसीटीसी टुरिझमच्या (IRCTC Tourism)  मते, या टूर पॅकेजमध्ये देशातील सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश असेल. हे सर्वात किफायतशीर टूर पॅकेजपैकी एक आहे. भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनचे बुकिंग IRCTC वेबसाइट https://www.irctc.co.in/ वर ऑनलाइन उपलब्ध आहे. आयआरसीटीसी  पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय (Zonal ) कार्यालये आणि प्रादेशिक (Regional) कार्यालयांद्वारे देखील बुकिंग करता येईल.

हे आहेत बोर्डिंग पॉइंट

भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेनसाठी बोर्डिंग पॉइंट बनवण्यात आले आहेत, जिथून प्रवासी या ट्रेनमध्ये प्रवास सुरू करू शकतात. मदुराई, डिंडीगुल, करूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टाई, काटपाडी, एमजीआर चेन्नई सेंट्रल, नेल्लोर, विजयवाडा ही स्टेशन आहेत. तर विजयवाडा, नेल्लोर, पेरंबूर, काटपाडी, जोलारपेट्टाई, सालेम, इरोड, करूर, डिंडीगुल, मदुराई ही डी-बोर्डिंग पॉईंट्स आहेत

पॅकेजमध्ये काय मिळणार?

पॅकेज अंतर्गत स्लिपर क्लासमध्ये रेल्वे प्रवासाची सुविधा असेल. रात्रीचा मुक्काम / धर्मशाळेत फ्रेश अप / मल्टी शेअरिंग आधार सुविधा असतील. सकाळचा चहा किंवा कॉफी, न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या व्यतिरिक्त दररोज १ लिटर पिण्याचे पाणी पुरवले जाईल. ट्रेनमध्ये टूर एस्कॉर्ट आणि सुरक्षा असेल. यासह, प्रवाशांसाठी प्रवास विमा देखील असेल.

तसेच, प्रवासादरम्यान  प्रवाशांना कोविड -१९  च्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व मानकांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क घालून सामाजिक अंतर पाळावे लागेल.