scorecardresearch

Premium

बुकिंग स्लीपर कोचचे, पण प्रवास एसी कोचमधून; जादा भाडं देण्याचीही गरज नाही, जाणून घ्या रेल्वेची ‘ही’ खास सुविधा

Indian Railways Auto Upgradation Scheme: भारतीय रेल्वेकडून प्रवाश्यांना तिकीट बुकिंगदरम्यान ऑटो अपग्रेडेशनची सुविधा दिली जाते.

indian railway news irctc railway auto upgradation know how passengers can opt this facility during train ticket booking
बुकिंग स्लीपर कोचचे पण प्रवास एसी कोचमधून; जादा भाड देण्याचीही गरज नाही, जाणून घ्या रेल्वेची 'ही' खास सुविधा (photo – financial express )

तुम्ही ट्रेनच्या स्लीपर कोचचे तिकीट बुक केले असेल, पण तुम्हाला प्रवासादरम्यान एसी कोचमध्ये जागा मिळाली आणि त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागणार नाही, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? बहुतेक प्रवासी हे शक्य नाही असे उत्तर देतील. परंतु, हे आता शक्य आहे. कारण भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे, ज्याद्वारे प्रवासी तिकीट ऑटो अपग्रेड करू शकतात.

रेल्वे तिकीट ऑफलाइन आणि ऑनलाइन बुक करताना रेल्वेकडून ऑटो अपग्रेडेशनचा पर्याय दिला जातो. हा पर्याय निवडल्यानंतर कोणत्याही थर्ड एसी, सेकंड एसी किंवा फर्स्ट एसी कोचमध्ये बर्थ उपलब्ध असेल तर त्यानुसार प्रवाशांचे तिकीट अपग्रेड केले जाते. पण, रेल्वेची ही सिस्टीम कशी काम करते जाणून घेऊ…

Passengers board local opposite door standing railway line diva railway station
रेल्वे मार्गात उभे राहून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न; दिवा रेल्वे स्थानकातील प्रकार
The video of the passengers traveling on the two-wheeler not using helmets is projected on the big screen
Video : अनोखा सिग्नल ! हेल्मेट न घालणाऱ्या प्रवाशांना शिकवला असा धडा..
A young man's stunts in a running train Thrilling video from Mumbai local is going viral
जीवघेणा खेळ! धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
railway police deployed at woman coaches of local train
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवानांकडून फेरीवाल्यांची तपासणी, महिला डब्याजवळ विशेष तपास पथक

ऑटो अपग्रेडेशन सुविधा नेमकी कशी आहे?

रेल्वेमध्ये ऑटो अपग्रेडेशनचा अर्थ ट्रेनमधील आरक्षित श्रेणीपेक्षा वरच्या श्रेणीतील तिकीट अपग्रेड होणे. जसे की, स्लीपर कोचचे तिकीट थर्ड एसी आणि थर्ड एसी कोचचे तिकीट सेकंड एसीपर्यंत अपग्रेड होते. विशेष बाब म्हणजे ऑटो अपग्रेड सुविधा एकदम फ्री आणि कोणतेही शुल्क न देता वापरता येते.

ट्रेनचे तिकीट मोफत अपग्रेड केव्हा होते?

अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान त्यांची सीट्स अपग्रेड करतात. मात्र, प्रवाशांना प्रवासाच्या वेळी तिकीट अपग्रेड करण्यासाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. परंतु, तुम्ही तिकीट बुक करताना ऑटो अपग्रेड पर्याय निवडला असेल तर रेल्वे तुमचे तिकीट मोफत अपग्रेड करते. मात्र, ट्रेनच्या डब्यातील बर्थच्या उपलब्धतेनुसार हे शक्य आहे.

पीआरएसच्या आधारे अपग्रेड होते तिकीट

भारतीय रेल्वेने २००६ मध्ये ऑटो अपग्रेडेशनची सुविधा सुरू केली. प्रवासी आरक्षण फॉर्मच्या सर्वात वरच्या बाजूला अपग्रेडेशनचा पर्याय दिला जातो, तर आयआरसीटीसी ऑनलाइन पोर्टलवर तिकीट बुक करतानादेखील हा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यानंतर रेल्वे ते तिकीट अपग्रेड करण्याचा विचार करते. चार्ट तयार करताना पीआरएस (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम) द्वारे अपग्रेडेशन स्वयंचलितपणे केले जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian railway news irctc railway auto upgradation know how passengers can opt this facility during train ticket booking sjr

First published on: 27-09-2023 at 13:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×