Indian Railway Shocking Video : तुमच्यापैकी अनेक जण ट्रेनने प्रवास करीत असतील, त्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेक जण ट्रेनचा पर्याय निवडतात. या प्रवासादरम्यान लोक भूक लागल्यास फेरीवाल्यांकडून भेळ, समोसा, वडापाव, सँडविच, चहा असे पदार्थ विकत घेतात. पण, सध्या रेल्वेस्थानकावरील एक अत्यंत किळसवाणा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही ट्रेनमधील कोणताही पदार्थ खायचा विचारही करणार नाही. हा व्हिडीओ पाहून लोक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

रेल्वेतील खाद्यविक्रेता अतिशय घाणेरड्या पद्धतीने पदार्थ ठेवण्याचे ट्रे धुताना दिसतेय. त्यातून तो खुलेआमपणे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक विक्रेता अॅल्युमिनियम ट्रे रेल्वे प्लॅटफॉर्मनजीकच्या रुळांजवळील नळाच्या पाण्याखाली धुतोय. नंतर हा विक्रेता हेच अॅल्युमिनियम ट्रे त्यामध्ये खाद्यपदार्थ ट्रेनमध्ये विकण्यासाठी वापरतो. तुम्ही विचार करा, हेच ट्रे तुम्हाला खाद्यपदार्थ देण्यासाठी वापरले जातात म्हणजे त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेकांनी हा व्हिडीओ पाहताच संताप व्यक्त केला आहे. अशा दूषित ट्रेमधील पदार्थ जर तुम्ही खाल्ले, तर फूड पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हा व्हिडीओ @india.24_7.365 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण, अशा प्रकारे रॅपर गोळा करून तो विकतही असेल, कशाला एखाद्याला चुकीचे समजता, जर काही जण हे ट्रे खाद्यपदार्थ विकण्यासाठी वापरतात, अशा प्रतिक्रियाही देत आहेत.