Indian Railway Video Viral: रेल्वेचे संबंधित अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतात. कधी रेल्वेतील मजेदार प्रसंगांचे, तर कधी रेल्वेतील भयानक गर्दीचे, कधी रेल्वे अपघाताचे, तर कधी रेल्वे प्रवासादरम्यानचे असे विविध धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ पाहून तर अनेकदा अंगावर काटा येतो. प्रवासामध्ये अशा अनेक घटना घडतात की, रेल्वे स्थनकावर सामानाची चोरी, भांडणे असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अनेकदा ट्रेनमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनाही समोर येतात. आता पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे. हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

विक्रेते, रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांच्यात गाड्यांमध्ये अनेकदा वाद होतात; परंतु रेल्वे कर्मचारी ट्रेनमधून उतरून प्रवाशाला मारहाण करताना क्वचितच दिसले आहेत. असाच एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.

नेमके काय घडले?

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांमधील अनेकांनी ट्रेनमधून खाली उतरून, त्या व्यक्तीला धक्काबुक्की केली. चार ते पाच रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिळून त्या व्यक्तीला पट्ट्याने मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : Video: “साॅरी म्हणून काय होणार, माझी मुलं उकाड्यात बसली आहेत”, वंदे भारतमधील एसी बंद असल्यानं प्रवाशाचा तुफान राडा )

ती मारहाण केल्यानंतर रेल्वे कर्मचारी चालत्या ट्रेनमध्ये चढले आणि प्लॅटफॉर्मवर बसलेल्या व्यक्तीला त्यांनी धमकावले. एका प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला; जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून लोक सरकार आणि रेल्वे मंत्रालयाची खिल्ली उडवीत आहेत.

समाजमाध्यमावर संतप्त प्रतिक्रिया

समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले, “या कर्मचाऱ्यांवर जीआरपीने तत्काळ कारवाई करावी आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकावे.” दुसऱ्याने लिहिले, “हे सर्व खासगी कामगार आहेत, त्यांना काढून टाकूनही काही करता येणार नाही. त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावा.”

येथे पाहा व्हिडीओ

समाजमाध्यमावर एका युजरने लिहिले, “हे प्रकरण इंदूरहून हावडा येथे जाणाऱ्या शिप्रा एक्स्प्रेसशी संबंधित आहे. त्या व्यक्तीने तिकीट काढण्याचा प्रयत्न केला; पण तिकीट न मिळाल्याने तो डब्यात चढला. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी त्याची बाचाबाची झाली आणि त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून त्या व्यक्तीला मारहाण केली”, असे एका व्यक्तीने म्हटले आहे. तथापि, हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती अद्याप आम्हाला मिळू शकलेली नाही.