scorecardresearch

Premium

अतिघाई संकटात नेई! रेल्वे फाटकाजवळ मृत्यूला चकवा देत कार चालकाने केले असे कृत्य; संतापजनक video व्हायरल

सोशल मीडियावर एक धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अल्टो कार भरधाव वेगाने येते आणि बंद रेल्वे क्रॉसिंग तोडून खालून जाते.

indian railways alto car broke the railway crossing came out from below driver stunt video
अतिघाई संकटात नेई!रेल्वे फाटकाजवळ मृत्यूला चकवा देत कार चालकाने केले असे कृत्य; संतापजनक video व्हायरल (@Bihar_se_hai twitter)

काहीवेळा लोक घाईगडबडीत अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. पण रेल्वे क्रॉसिंगजवळ अशाप्रकारची घाई अनेकदा जीवघेणी ठरु शकते. रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन गेल्यावर फाटक उघडतो आणि त्यानंतर लोक रुळ ओलांडतात. पण काही लोक असे आहेत जे घाईघाईत बंद रेल्वे फाटकही क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. पण अशाप्रकारे बंद रेल्वे फाटक ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. मात्र काही लोक त्याकडे दुर्लक्ष करत फाटक ओलांडू लागतात. असाच एक धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अल्टो कार भरधाव वेगाने येते आणि बंद रेल्वे क्रॉसिंग तोडून खालून निघून जाते.

अल्टो कारने घाईगडबडीत तोडले रेल्वे फाटक

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक अल्टो कार रेल्वे क्रॉसिंगवर भरधाव वेगाने येते आणि फाटक बंद असल्याचे पाहिल्यावर तो तोडण्याचा प्रयत्न करते. धक्कादायक बाब म्हणजे कार फाटकाच्या पलीकडे पोहोचताच मागून एक ट्रेन सुसाट वेगाने जाते. यावेळी कार चालवणारा चालक कसलीही भीती न बाळगता फाटकातून बाहेर निघण्यासाठी गेटवर जोरदारत धडक देतो. असे दोन-तीन वेळा धडक दिल्यावर तो गेटवर करतो आणि नंतर खालून सुसाट वेगाने निघून जातो. यादरम्यान एक व्यक्ती मागून येतो आणि त्याच्या मोबाईलवर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो क्लिक करतो.

egg tea,
चहाप्रेमींनो, सावधान! चहामध्ये असू शकते कच्चे अंड; विचित्र रेसिपी होतेय व्हायरल: पाहा व्हिडीओ
person eating manchurian in Metro Bangalore metro has taken action against him
Video : मेट्रोत ‘कोबी मंचुरियन’ खाणं पडलं महागात ! बंगळुरू मेट्रोने केली व्यक्तीवर कारवाई…
passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
tiger most trending video
स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची हौस पडली महागात, अचानक पाठीमागून आला वाघ…, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

@Bihar_se_hai नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, एवढी घाई करणारे पान शॉपवर थांबतात. या व्हिडिओला आतापर्यंत ९० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, तो एक गुंडा आहे जो गुन्हा केल्यानंतर पळून गेला आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, रेल्वे कायद्याचे कलम १६० लागू केले जाईल, कारण हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यावर तिसऱ्या युजरने गमतीत लिहिले की, “त्याने आपल्या भाओजीची गाडी आणली असावी.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian railways alto car broke the railway crossing came out from below driver stunt video sjr

First published on: 22-09-2023 at 19:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×