Indian Railway Viral Video : देशभरातील लाखो लोक दररोज प्रवास करतात. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर ट्रेन हा एक उत्तम मार्ग आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. यातील काही अनुभव हे फार चांगले असतात तर काही खूप वाईट. सध्या ट्रेनमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरुणी असे काही कृत्य करत आहेत जे पाहून तुम्हीदेखील घाबरून जाल. भरट्रेनमध्ये तरुणी केस मोकळे सोडून इतक्या जोरजोरात किंचाळत, असे काही विचित्र हावभाव करत आहेत की, ते पाहून तिथे बसलेले प्रवासी खूप घाबरले. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

व्हिडीओमध्ये दोन्ही तरुणी इतक्या विचित्र वागत आहेत की, पाहणाऱ्यांनाही त्या नेमकं अस का वागत आहेत? असा प्रश्न पडला आहे. हा व्हिडीओ जम्मूहून कठुआला जाणाऱ्या ट्रेनचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिला ट्रेनमध्ये प्रवाशांसमोर खूप विचित्र वागताना दिसत आहेत. दोघीही केस मोकळे सोडून मान वर-खाली, गरगर फिरवतात. इतकेच नाही तर चेहऱ्याचे विचित्र हावभाव करत हातपाय वाकडे करतात. यावेळी सतत त्या जोरजोरात किंचाळत आहेत. यातील एक तरुणी तर मध्येच सीटवर लटकून चक्कर आल्यासारखी दुसऱ्या तरुणीच्या अंगावर पडते. तर दुसरी केस मोकळे ठेवून मोठ्याने ओरडत सीटवर स्वत:ला आपटतेय. यावेळी आणखी एक तरुणी जमिनीवर पडलेला दिसतोय.

ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमध्ये उंदरांचा सुळसुळाट; प्रवाशांच्या महागड्या बॅगांची दुर्दशा; VIDEO पाहून युजर्सचा संताप

व्हिडीओ पहिल्यानंतर समजू शकत नाही की, या तरुणींबरोबर नेमकं काय झालं आहे? या अशा का वागतायत? व्हिडीओमध्ये दिसतेय की, इतर प्रवासी ही घटना दूरून पाहत आहेत. कोणीतरी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता व्हायरल होत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर एका युजरने लिहिले की, तिकीट नसल्यास त्यापासून वाचवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. आणखी एकाने लिहिले की, हा आजार ट्रेनमध्ये कधी जाऊन पोहोचला. आणखी एका युजरने लिहिले की, ड्रामा करणाऱ्या तरुणींना पहिले ट्रेनमधून खाली उतरवले पाहिजे.

ट्रेनमधील हा व्हिडीओ @miss_mahajan_1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. पण या तरुणी असे का वागतायत याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.