अनेकांचे स्वप्न असतं की आपल्याजवळ एक Rolls Royce कार असावी पण आज आपण अशा व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्याजवळ १५ Rolls Royce कार आहेत. विशेष म्हणजे ज्या रंगाची पगडी त्या रंगाची तो Rolls Royce कार खरेदी करतो. हा मूळचा भारतीय वंशाचा असून यूकेमध्ये राहतो. जो त्याच्या लक्झुरियस लाइफमुळे कायम चर्चेत असतो.
रुबेन सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. Rolls Royce कारसोबत त्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या पगडीचा रंग आणि कारचा रंग सारखा दिसत आहे. हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा : MS Dhoni च्या नावाने मुंबई ट्रॅफिक पोलीस करीत आहेत लोकांना सतर्क, वाचा काय आहे प्रकरण, पाहा व्हायरल पोस्ट
मागील दिवाळीत रुबेननी स्वत:ला वेगवेगळ्या रंगांच्या पाच Rolls Royce कार गिफ्ट केल्या होत्या. सध्या त्याच्याकडे 15 Rolls Royce कार आहेत. याशिवाय रुबेनकडे 3.22 कोटींची Lamborghini Huracan आणि Bugatti Veyron ही कारसुद्धा आहे. त्याच्याकडे एक Ferrari F12 Berlinetta, Porsche 918 Spyder आणि एक Pagani Huayra कारसुद्धा आहे.
हेही वाचा : Viral Video : चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुणांचा रोमान्स; किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल
रुबेन सिंह कोण आहे?
रुबेन हा भारतीय वंशाचा असून १९७० पासून त्याचे कुटुंब यूकेमध्ये राहते. इशर कॅपिटल आणि कस्टमर सर्व्हिस आउटसोर्सिंग AlldayPA नावांच्या कंपनीचे प्रायव्हेट इक्विटी फर्म त्याच्या नावाने आहे. रुबेन सिंहला अनेक जण ब्रिटिश बिल गेट्ससुद्धा म्हणतात. तो स्वत:ला ब्रिटिश शीख म्हणून मिरवतो.
सध्या त्याचे Rolls Royce कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट singhreuben यावरून अनेक फोटो शेअर केले आहे. दोन लाख १४ हजार लोक त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.