Indian Tradition Treating Daughters-In-Law Like Lakshmi :भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा प्रचंड आदर करण्याची शिकवण दिली जाते. स्त्रियांना देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. असे म्हणतात की, “घरातील स्त्री आनंदी असेल तर त्या घरात सर्वजण आनंदी असतात.” तुम्हाला वाटेल यात काय नवीन? भारतीयांसाठी हे गोष्ट सामन्य असली तरी परदेशातील लोकांसाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला देवी मानले जाते, तिचा देवीसारखा आदर केला जातो हे गोष्ट अनेक परदेशी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताचा एका युक्रेनियन तरुणी सँड्रा सोशल मीडियावर अचानकच व्हायरल झाली आहे. तिच्या सासऱ्यांनी तिला घरची लक्ष्मी म्हणत तिला कसा आदर दिला आणि तिला पैसे दिले हे ती अत्यंत कौतुकाने आणि आनंदाने सांगत आहे. तिचा हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला भिडला.
सँड्राने तिच्या इंस्टाग्रामवर ३ एप्रिलला एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये सँड्रा सांगते, “POV: तुम्ही भारतीयाशी लग्न केले, आणि आता तुम्ही एक देवी आहात. ती तिचा कामात व्यस्त असताना अचानक तिचे सासरे तिच्याकडे येऊन तिला पैसे देतात. तिला याचे आश्चर्य वाटते की असे का केले. सँड्राने सांगते की, “माझ्या सासऱ्याने मला फक्त असे सांगितले की, ‘हे तुझ्यासाठी आहे. कारण या घरची तू लक्ष्मी आहेस.’” तिला हे ऐकून फार आनंद झाला आणि धक्का देखील बसला.
भारतीय संस्कृतीची जाणीव (Understanding Indian Tradition)
सँड्राला जरी सुरुवातीला याचे आश्चर्य वाटले, परंतु नंतर तिने समजले की भारतीय घरात मुलींना किंवा महिलांना घराची संपत्ती आणि समृद्धी समजले जाते. तिच्या सासऱ्यांनी तिला सांगितले की, घरातील मुली आणि बहिणी जर आनंदात असतील, तर घरातील वातावरण आणि उत्पन्न वाढते. सँड्राला ही परंपरा “cute आणि interesting” वाटली.
सँड्राने व्हिडिओमध्ये हसत सांगितले, “माझे सासरा म्हणाला, मी युक्रेनियन आहे, पण तू या घराची लक्ष्मी आहेस. जर मी आनंदी राहिलो, तर त्याचे उत्पन्न वाढते. हे मला खूप आवडले, खूप cute वाटले.”
नेटकऱ्यांनी केले कौतुक (Internet Reacts with Love)
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ५.४ दशलक्ष हिट्स आणि ३ लक्षापेक्षा जास्त लाईक्स मिळवून Viral झाला. लोकांनी सासऱ्याच्या प्रेमळ कृतीची प्रशंसा केली. काहींनी सँड्राचा प्रतिसाद गोंडस असल्याचे म्हटले, तर काहींनी भारतीय परंपरेचा अर्थ सांगितला.
एक यूजर म्हणाला, “हीच आपली हिंदू संस्कृती आहे, जिथे मुलींना लक्ष्मीप्रमाणे मानले जाते.” दुसऱ्याने लिहिले, “तिला ‘देवी’ म्हणणे फक्त प्रतीकात्मक नाही, तर तिच्या सामर्थ्य, कृपा आणि घरात निर्माण केलेल्या सुसंवादचे कौतुक आहे.”
लोकांनी म्हटले, “तुम्ही खूप चांगल्या कुटुंबात लग्न केले आहेस, जे तुला निस्वार्थ प्रेम देतात.” काहींनी शुभेच्छाही दिल्या, “सर्व स्त्रियांना लक्ष्मीप्रमाणे आदर मिळाला पाहिजे.”
हा गोड अनुभव भारतीय संस्कृतीच्या खास परंपरेला आणि आंतरराष्ट्रीय विवाहात निर्माण होणाऱ्या सुसंवादाचे सुंदर उदाहरण ठरला आहे.
