Indian Railway Viral Video: “एवढं आहे तर फर्स्ट क्लासमध्ये जा, भरपूर जागा आहे ट्रेनमध्ये थोडं ऍडजस्ट करा”, एरवी मुंबईच्या लोकलमध्ये ही वाक्य ऐकावी लागतातच. गैरसोय होत असल्याचं कुणी अवाक्षरही काढलं तरी, “तुम्ही काय ट्रेनची सीट बुक करून ठेवलीये का?” असा उलट प्रश्न केला जातो. पण खरं सांगायचं तर लोकलमध्ये ट्रेनची सीट बुक केली नसल्याने होणारा मनस्ताप लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सीट बुक करूनही प्रवाशांना सहन करावा लागतोच. कोकणकरांनो तुम्हाला तर अगदी पटलं असेल ना? कधी माणुसकी दाखवा म्हणत तर कधी थेट अरेरावी करत आरक्षित डब्यांमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न उन्हाळयात तर फारच पेटून उठतो. असाच काहीसा एक प्रकार सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. रेल्वेच्या डब्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीमुळे तिकीट काढणाऱ्यांनाच जागा उरली नसल्याचे दृश्य या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.

नेमका प्रसंग घडला कुठे?

आनंद विहार टर्मिनल आणि गाझीपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली असल्याचे समजतेय. तुम्ही बघू शकता की, स्लीपर कोच खचाखच भरलेला होता, प्रवासी जमिनीवर बसले होते, तर दोन सीट्सच्या मधल्या जागेत सुद्धा खूप लोक उभे आहेत. लोकांना झोपायला, बसायला सोडा हलायला सुद्धा जागा दिसत नाहीये.

railway pravasi sanghatana expressed anger for running ghatkopar cstm local without home platform
‘होम प्लॅटफॉर्म’ नसताना घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवणे गंभीर, लोकलचा विस्तार करण्याचे प्रवासी संघटनेचे मत
Flight
२०० पेक्षा जास्त विमान प्रवासात केली चोरी, सहप्रवाशांच्या दागिन्यांवर मारायचा डल्ला, पण एक चूक अन् थेट तुरुंगात रवानगी!
robber bride
महिलेने केले ३२ पुरुषांशी लग्न, कुठल्याच नवऱ्याबरोबर मधुचंद्र नाही, कारण ऐकून धक्का बसेल
new york city women assaulted belt
Video : “पट्ट्याने गळा आवळला, दोन गाड्यांमध्ये ओढलं आणि…”, मोठ्या शहरातील घटनेने खळबळ
malaysia development berhad scandal
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
fishermen from palghar gujarat arrested for fishing in pakistan s
पालघर, गुजरातमधील मच्छीमार पाकिस्तानच्या सागरी हद्दीत का जातात? पाकिस्तानी कैदेतून सुटका होण्यास विलंब का होतो?
Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
dombivli kopar illegal building marathi news
डोंबिवलीतील कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी, परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी

‘X’ वापरकर्ता , @5gqwedr, याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “ट्रेन नंबर 22420 मध्ये एवढी गर्दी होती की टीसी सुद्धा ट्रेनमध्ये चढले नाहीत. गर्दीतील अर्ध्याहून अधिक लोक विनातिकीट प्रवास करत आहेत. हा स्लीपर कोच आहे, आरक्षित आहे. तरीही हे लोक जनरल तिकिटावर इथे आले आहेत. मग स्लीपर कोचचं तिकीट काढून उपयोगच काय, झोपायला काय तर बसायला पण जागा नाहीये.”

रेल्वेच्या अधिकृत ग्राहक सेवा अकाऊंटवरून पोस्टला प्रतिसाद देण्यात आला आहे. रेल्वेने प्रवाशाला तपशील शेअर करायला सांगितले होते.

दरम्यान, या पोस्टवर सुद्धा काहींनी संताप व्यक्त केला आहे. “तुम्ही फक्त तपशील मागवा. मुळात ही समस्या उद्भवतेच का? तुम्ही प्रश्न सोडवेपर्यंत सुद्धा ज्यांना त्रास व्हायचा तो होतोच, त्यांना तिकिटाचे पैसे परत देणार का?” असे प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारले आहेत. या गर्दीमुळे अलीकडेच एका युजरने आपल्या बहिणीला दुखापत झाल्याचे पोस्ट करून सांगितले होते. गर्दीत हरवलेला तिचा मुलगा शोधण्यासाठी ट्रेनमधून उतरावे लागले त्यात तिला दुखापत झाली अशी तक्रार संबंधित युजरने केली होती.