Blinkit vs pakistani company: भारत गेल्या दहा वर्षात इतका वेगाने प्रगती करतोय की अनेक विकसित देशांना देखील भारताचे सामर्थ्य मान्य करावे लागले आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तान भारताशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात असतो. पण तो नेहमीच मागे पडतो. पाकिस्तानची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई थांबण्याचे काही नाव घेत नाही आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खूपच वेगळ्या वळणावर आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. आपल्याला माहिती आहे की, पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. कधी महागाईमुळे तर कधी आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो चर्चेत येत असतो. दरम्यान आता पुन्हा एकदा उगाच डिवचायला आलेलं पाकिस्तान तोंडावर आपटलं आहे.
त्याचं झालं असं की, पाकिस्तानची ई-कॉमर्स कंपनी क्रंबल आणि भारताची ब्लिंकिट यांनी सोशल मीडियावर एकमेकांचे पाय खेचले आहेत. हा संवाद बिस्किटांच्या ऑर्डरने सुरू झाला आणि पाकिस्तान क्रिकेट संघावर संपला. या संभाषणाची सुरुवात कशी झाली आणि पाकिस्तानची क्रिकेट टीम त्यात कशी गुंतली हे पाहा.
खरं तर झालं असं की, पाकिस्तानच्या क्रंबल आणि भारताच्या ब्लिंकिटमध्ये एका पोस्टवरून वाद सुरू झाला, त्यावर ब्लिंकिटने पाकिस्तानी कंपनीच्या पोस्टला उत्तर देताना म्हटलं… “हाहाहा, तुम्ही एक बिस्किट देऊ शकत नाही आणि तुम्हाला पाकिस्तानचा टॉप ब्रँड बनायचं आहे. यावर पाकिस्ताननेही पुन्हा ब्लिंकिटच्या एका पोस्टवर म्हटले आहे की, “तुमच्या सोशल मीडियावर असे दिसून आले आहे की तुम्ही घाईघाईने महिला अंडरवेअर पुरुष ग्राहकाला दिल्या होत्या. एकमेकांचे पाय खेचत असताना पाकिस्तान एवढ्यावरच शांत बसलं नाही तर पुन्हा डिवचलं आणि क्रंबलने ब्लिंकिटच्या पोस्टवर कमेंट करत “तुमची जीभ ज्या वेगात चालते त्याच वेगात तुमची डिलिव्हरी असावी. यावर, ब्लिंकिटने क्रंबलला पुन्हा प्रत्युत्तर दिले, “आमची डिलिव्हरी वेगवानच आहे, तुम्ही तुमच्या गोलंदाजांच्या खराब चेंडूच्या डिलिव्हरीकडे लक्ष द्या.”
पाहा फोटो
हेही वाचा >> रिलसाठी काहीही! रील बनवण्यासाठी तरुणाने दुचाकीने ओढली ट्रेन; धोकादायक स्टंटचा VIDEO व्हायरल
भारत आणि पाकिस्तानच्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये सुरू झालेले हे युद्ध काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. नेटकरीही या प्रकारावर हसत आहेत.