“भारतीय रामाने चिनी ड्रॅगनला धडा शिकवला”; तैवानमध्ये व्हायरल होतोय फोटो

१९ हजारहून अधिक जणांनी हा फोटो केला आहे शेअर

Photo: Twitter/TaiwanNews
भारत आणि चीनदरम्यान सीमेजवळ झालेल्या हिंसक झटापटीनंतर तैवानमध्ये सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये भगवान राम चिनी ड्रॅगनवर वार करताना दिसत आहेत. या फोटोवर ‘वी काँकर, वी कील’ म्हणजेच आम्ही विजय मिळवू आणि (शत्रूला) ठार करु असं लिहिण्यात आलं आहे. तैवान न्यूज नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो शेअर करताना ‘फोटो ऑफ द डे’ या कॅफ्शनसहीत शेअर करण्यात आला आहे. भारताच्या रामाने चीनच्या ड्रॅगनवर हल्ला केला असं तैवान न्यूजने लिहिलं आहे.

तैवानमध्ये हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर भारतामध्येही सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहे. या पोस्टवर भगवान रामाने चिनी ड्रॅगनवर धनुष्यबाण रोखल्याचे दिसत आहे. भारतामध्ये दसऱ्याला अशाप्रकारचे फोटो व्हायरल होताना दिसतात. यामध्ये भगवान राम रावणाचा वध करताना दाखवण्यात येते. भारतामध्ये वाईटाने चांगल्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव म्हणून दसरा साजरा केला जातो. तैवानमध्ये व्हायरल होत असलेल्या या फोटोमधून चांगल्या विचाराच्या भारताने वाईट विचार असणाऱ्या चीनवर हल्ला केल्याचा संदेश देण्यात येत आहे.

तैवानमध्ये चीनविरोधात प्रचंड राग आहे. आपल्या वर्चस्ववादी भूमिकेमुळे चीनचे सर्वच शेजरी देशांबरोबर संबंध फारसे चांगले नाहीत. चीन आपल्या आजूबाजूच्या लहान मोठ्या देशांच्या भूभागांवर अनेकदा हक्क सांगतो आणि ते बळकावण्याचा प्रयत्न करतो. तैवानविरोधातही चीनने अनेकदा खुरापती केल्या आहेत. मात्र तैवान चीनच्या तबाव तंत्राला फारसे महत्व देत नाही.

नक्की वाचा >> ‘ही’ ५२ चिनी अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक; वाचा संपूर्ण यादी

करोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे लढणाऱ्या तैवानवर चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तैवानने ज्या पद्धतीने करोना परिस्थिती हाताळली त्यावरुन जगभरात तैवानचे कौतुक होताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indias rama takes on chinas dragon taiwan news unique photo of the day scsg

ताज्या बातम्या