IndiGo Flight Attendants Viral Video : इंडिगो विमानसेवेच्या तांत्रिक कामकाजाच्या अडचणी सातव्या दिवशीही सुरूच होत्या. त्यामुळे देशभरात शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्या किंवा उशिरा धावत होत्या. अशा गोंधळात अनेक प्रवासी आरडाओरडा करताना, कर्मचाऱ्यांवर ओरडताना तर काही जण वातावरण थंड करण्यासाठी गाणं गाताना, गरबा खेळतानाही दिसत होते. पण, या सगळ्यात एका प्रवाशाने एक खूप छान, मनाला स्पर्श करणारा व्हिडीओ शेअर केला आणि तो सगळ्यांचे मन जिंकून गेला आहे.

रश्मी त्रिवेदी नावाची महिला प्रवासी नेहमीच इंडिगोने तिचा प्रवास करते. या सगळ्या गोंधळादरम्यान तिच्या बाळासह ती विमानतळावर वाट बसली होती. यादरम्यान इंडिगोचे कर्मचारी नेहमीप्रमाणे शक्य तितक्या प्रवाशांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. विमान यायला उशीर झाला. पण दरम्यान तिचे लहान बाळ इंडिगोच्या कर्मचाऱ्यांबरोबर आनंदाने वेळ घालवत होते आणि मजेत खेळत होते; ही पाहून काही वेळेसाठी का होईना आईचे फ्लाईट्स रद्द होण्याचे टेन्शन काही काळ दूर झाले.

IndiGo चं स्टाफ नेहमीच चांगली सेवा देतं आलं आहे (Viral Video)

विमान रद्द आणि उशिरा आल्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर वाट पाहत बसले होते. काही जणांना स्वतःचे लग्न, तर कोणाला परीक्षा देता आल्या नाही; यादरम्यान अनेक जणांना कामावर जाण्यासाठी सुद्धा अडचणी आल्या. पण, या परिस्थितीही इंडिगोचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाला शांत करण्याच्याही प्रयत्नात दिसले. तसेच काहीसे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. इंडिगोच्या फ्लाइट अटेंडंट्स महिला प्रवाशीच्या बाळाशी प्रेमाने संवाद साधताना, त्याला सांभाळताना दिसत आहेत; जेव्हा प्रवासी उशिरापर्यंत विमानाची वाट पाहत होते.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @itsrashmishines या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “फ्लाइट्स रद्द झाल्या, उशीर झाला; सगळंच चालू होतं. पण तरीही, IndiGo चं स्टाफ नेहमीच चांगली सेवा देत आला आहे. मी नेहमी IndiGo नेच प्रवास केला आहे, आणि या काळात बऱ्याच लोकांना त्रासही झाला. पण, या सगळ्यातही, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं खूप महत्त्वाचं असतं” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.