Indigo passengers sitting on the runway : तीन ते चार दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo) विमान कंपनीत निर्माण झालेल्या गोंधळामुळे गेल्या सहा दिवसांत ४०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अशातच ‘लाईटहाऊस जर्नीलिझम’ला सोशल मीडियावर एक दावा मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले, ज्यामध्ये एका जुन्या फोटोला सध्याच्या ‘इंडिगो’च्या परिस्थितीशी जोडले जात आहे.

या व्हायरल फोटोमध्ये लोक रनवेवर (धावपट्टीवर) बसल्याचे दिसत आहेत. त्यामध्ये मागे ‘इंडिगो’चे विमानही दिसत आहे. युजर्स हा फोटो अलीकडील असल्याचा दावा करीत शेअर करीत आहेत. मात्र, तपासादरम्यान आम्हाला हा फोटो २०१८ मधील असल्याचे आढळून आले.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) @ajzwayy युजर मनीष आरजे यांनी खोट्या दाव्यासह हा व्हायरल फोटो शेअर केला आहे.

इतर युजर्सही हाच फोटो अशाच दाव्याद्वारे शेअर करीत आहेत…

https://www.instagram.com/p/DR32DsjEb8D

तपास..

आम्ही व्हायरल इमेजवर ‘रिव्हर्स इमेज सर्च’ करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला हा फोटो economictimes.com च्या एका लेखात वापरलेला आढळला.

हा लेख २०१८ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्याची हेडलाईन : ‘इंडिगोचे प्रवासी, क्रू (कर्मचारी) उपलब्ध नसल्यामुळे ७ तास धावपट्टीवर होते’, अशी होती.

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “इंडिगोचे दिल्ली-बंगळुरू विमान दिल्ली विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी पहाटे सात तासांहून अधिक काळ उभे होते. त्याचे कारण कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता; ज्यामुळे प्रवाशांना नंतर विमानाच्या आत किंवा धावपट्टीवर बसून राहावे लागले.”

https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/airlines-/-aviation/indigo-passengers-stranded-on-tarmac-for-7-hours-for-non-availability-of-crew/articleshow/64158022.cms?from=mdr

महाराष्ट्र डीजीआयपीआर (DGIPR)च्या अधिकृत पेजवरही या फोटोबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले होते…

त्यांच्या कॅप्शनमध्ये, “इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाजवळ धावपट्टीवर प्रवासी बसल्याचा व्हायरल फोटो असल्याचा दावा खोटा आहे. हा फोटो सध्याच्या परिस्थितीचा नसून जुना आहे. हा फोटो मे २०१८ मधील दिल्ली विमानतळावरील आहे, जेव्हा वादळामुळे आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांवर अशी वेळ आली होती”, असे म्हटले आहे. (की- त्यांच्या कॅप्शनमध्ये, “इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाजवळ धावपट्टीवर प्रवासी बसले असल्याचा व्हायरल फोटोद्वारे केला जाणारा दावा खोटा आहे. हा फोटो सध्याच्या परिस्थितीचा नसून, तो जुना आहे. हा फोटो मे २०१८ मधील दिल्ली विमानतळावरील आहे, जेव्हा वादळ आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांवर अशी वेळ आली होती”, असे म्हटले आहे.)

आम्हाला याच फोटोबाबत माहिती देणारे इतरही अनेक न्यूज रिपोर्ट्स आढळले…

https://english.tupaki.com/highlights/article/no-crew-passengers-stranded-on-the-runway-for-7-hrs/71021

IndiGo passengers stranded on tarmac for 7 hours for non-availability of crew

https://www.behindwoods.com/news-shots/india-news/indigo-passengers-made-to-wait-for-7-hours-due-to-staff-unavailability.html

निष्कर्ष : धावपट्टीवर बसलेल्या प्रवाशांचा व्हायरल फोटो २०१८ मधील जुना आहे. हा फोटो अलीकडील असल्याचा दावा करून, सध्याच्या इंडिगो विमानाच्या परिस्थितीशी खोट्या पद्धतीने जोडला गेला आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे.