Nitin Gadkari Viral Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २० फेब्रुवारी रोजी नागपूर ते दिल्ली असा इंडिगो विमानातून प्रवास करत होते. यावेळी विमान टेक ऑफ होण्याआधी मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष स्वागत करण्यात आले. या क्षणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नागपूर ते दिल्ली या इंडिगो विमानाच्या पायलटने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची विशेष घोषणा करताच उपस्थित प्रवाशांनीही टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतेय?

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पायलट नितीन गडकरींना उद्देशून म्हणतोय की, “केंद्रीय मंत्री आमच्यासोबत प्रवास करत असल्याचे पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो, मी तुमचा कॅप्टन आहे आणि माझ्यासोबत माझा सहकारी शिवेंद्र आहे. सर या फ्लाइटमध्ये आम्ही तुमचे स्वागत करतो.” पायलटने ही घोषणा सुरू करताच नितीन गडकरींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. यावेळी पायलट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वाहतूक क्षेत्रातील भरीव कार्याचेही कौतुक केले.

ट्रेनमधील तरुणीच्या कन्फर्म सीटवरुन उठण्यास प्रवाश्याचा नकार; ट्विट करताच रेल्वेने २० मिनिटांत केली अशी मदत; पाहा VIDEO

यावेळी नितीन गडकरी यांच्यासाठी विमानात उपस्थित सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या आणि एकच जल्लोष केला. सोशल मीडियावरील युजर्सनेही हा व्हिडीओ पाहून आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी पायलटचेही खूप कौतुक केले आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, स्वागत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. यातून क्रू मेंबरचा नम्र स्वभाव दिसून येतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indigo pilot passengers extend warm welcome to nitin gadkari on nagpur delhi flight video viral sjr
First published on: 21-02-2024 at 13:03 IST