scorecardresearch

…अन् तरुणाने होळीत नाचताना स्वतःच्याच छातीत भोसकला चाकू; पाहा धक्कादायक Video

होळीमध्ये नाचताना एका तरुणाने स्वतःवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

(फोटो – व्हिडीओतून स्क्रीन ग्रॅब)

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात होळीमध्ये नाचताना एका तरुणाने स्वतःवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. नाचत असताना चाकूने स्टंट करत असतानाच मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने स्वतःवर वार केला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तीस वर्षांचा माणूस हातात चाकू घेऊन मद्यधुंद अवस्थेत गाण्यावर नाचताना दिसत आहे. स्टंट करताना दिसत असलेल्या व्यक्तीने चुकून स्वतःवर चार वार केले. त्याच्या छातीतून रक्त वाहू लागल्यावर त्याला नेमकं काय घडलं ते कळलं. व्हिडीओमध्ये रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तीकडे एक महिला धावत येताना दिसत आहे, त्याच्या सभोवताली असणारे सर्वजण नाचत होते, थोडावेळ त्यांनाही कळलं नाही, की नेमकं काय झालंय. दरम्यान, जखमी तरुणाला थोड्या वेळाने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात हिंदूस्तान टाईम्सने वृत्त दिलंय.

“होलिका दहन करताना चाकूने जखमी स्वतःवर वार केलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे,” असे बाणगंगा उपनिरीक्षक योगेश गराशिया यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indore man accidentally stabs himself to death during holika dahan dies hrc