Indurikar Maharaj Daughter Viral Video: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. “नाचू किती नाचू किती, कंबर लचकली…” या गाण्याच्या तालावर तिच्या डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर हा व्हिडीओ अगदी इतर साधारण व्हिडीओप्रमाणेच आहे, पण यामध्ये डान्स करताना जी व्यक्ती आहे त्यामुळे हा व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहे. तसंच त्यावर नेटकरी तोंडसुखही घेत आहेत. यंग महाराष्ट्र नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
डान्स व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराजांची मुलगी गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्समधील उत्साह आणि आत्मविश्वास पाहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. काहींनी तिच्या डान्सचं कौतुक केलं, तर काहींनी मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“महाराजांची मुलगी पण भारीच!”
इंदुरीकर महाराजांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आला की तो चर्चेत येतो. या व्हिडीओलाही नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. डान्सचा अंदाज, गाण्याची निवड आणि व्हिडीओतील तिचा उत्साह यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्समुळेही या व्हिडीओची चर्चा आणखी रंगली आहे.
https://www.instagram.com/reel/DcxSqxNMPCi/?utm_source=ig_web_copy_link&igsi=NTc4MTIwNjQ2YQ==
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तिच्या डान्सचं कौतुक केलं, तर काहींनी इंदुरीकर महाराजांच्या संदर्भात मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. इंदोरीकर महाराज दुसऱ्यांच्या मुलांना अनेकदा नावं ठेवतात, मात्र आता त्यांच्या मुलीने डान्स व्हिडीओ केल्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं. मात्र काहींनी त्यांच्या मुलीची बाजू घेत सकारात्मक कमेंट्सही केल्या आहेत.
