महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. ते सतत नवनवीन सोशल मीडिया ट्रेंड, देशी जुगाड यासारख्या व्हायरल व्हिडीओची दखल घेत असतात. यासाठी ते आपल्या ट्विटर अकाऊंटचा वापर करतात. शिवाय एवढ्या कामाच्या व्यापातून ते ट्विटरवर सक्रिय असतात, या गोष्टीचं अनेक नेटकऱ्यांना कौतुक वाटतं. आनंद महिंद्रा हे त्यांच्या मंडे मोटिव्हेशनमुळेही चर्चेत असतात. कारण ते यानिमित्ताने प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत लोकांमध्ये जगजागृती करण्याचा प्रयत्न करतात.

शिवाय आनंद महिंद्रा फक्त मोटिव्हेशनलच नव्हे तर कधी कधी लोकांचं मनोरंजन करणारे भन्नाट कॉमेडी व्हिडीओदेखील शेअर करत असतात, जे लोकांनाही खूप आवडतात. अशातच आज त्यांनी एका हवेत उडणाऱ्या बाईकचा व्हिडीओ ट्टिटरवर शेअर केला आहे. या बाईकचा वापर जगभरातील पोलिस दलामध्ये केला जाईल असा माझा अंदाज असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महिंद्रा यांनी या बाईकचा व्हिडीओ शेअर करताच त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती

हेही पाहा- Video: उड्डाणपुलावर उभा राहून ‘तो’ उधळत होता पैसे; त्यानंतर जमलेल्या लोकांनी काय केलं ते एकदा पाहाच

हवेत उडणाऱ्या बाईकचा व्हिडीओ ट्विट करताना आनंद महिंद्रा कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘जपानी स्टार्टअपची उडणारी बाईक, ज्यासाठी यूएसमध्ये सुमारे $800K इतका खर्च येईल. मला वाटतं आहे की, प्रामुख्याने जगभरातील पोलीस दलामध्ये ही बाईक वापरली जाईल, चित्रपटांमध्‍ये काही मनोरंजक नवीन चेस सीक्‍वेन्‍ससाठीही वापरली जाईल…’ त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये या बाईकबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही बाईक जगातील पहिली उडणारी बाईक असून ती ४० मिनिटांपर्यंत हवेत उडू शकते असंही सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा- समुद्राच्या तळाशी भांडणाऱ्या दोन माशांचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “कुठेच शांतता नाही…”

दरम्यान, या ट्टिवटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘कदाचित ही बाईक पहिल्यांदा हॉलिवूड आणि नंतर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये वापरली जाईल. तर आणखी एकाने मराठीत कमेंट केली आहे. त्याने म्हटलं आहे, ‘प्रयोग छान आहे, पण गळ्यात नायलॉनचा मांजा अटकून आपल्याकडे बाईक चावलणारा माणूस मरेल अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, कृपया ही बाईक युपी पोलिसांना देऊ नका, अशा काही गमतीशीर तर काहीजण उत्सुकतेने या बाईकबाबतची अधिक माहिती विचारणाऱ्या कमेंटही व्हिडीओवर करत आहेत.