आनंद महिंद्रांवर पडलाय ‘या’ लहानग्याचा प्रभाव; घेत आहेत आयुष्यात आनंदी राहण्याची शिकवण

या मुलाच्या बोलण्याने आनंद महिंद्रा प्रभावित झाले असून ‘मी रोज सराव करत असलेल्या गोष्टींचे मूल्यमापन करायला या मुलाने मला भाग पाडले आहे.’, असे ते म्हणाले आहेत.

anand mahindra
या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी हा विडिओ शेअर केला आहे. (Photo : Twitter/@anandmahindra)

आपण सर्वांनाच आयुष्यात सुखी राहायचं असतं आणि त्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतोही. परंतु कधी कधी निराशा आपल्याला चहूबाजूने घेरते आणि आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही. अशावेळी आपल्याला आयुष्याकडून अनेक तक्रारी सुरू होतात. परंतु आपल्या आयुष्यातील सुख आणि दुःखासाठी आपणच जबाबदार असतो. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याचे महत्त्वपूर्ण विचार ऐकून आपण समजू शकता की आपल्याला दररोज कोणत्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे. या मुलाच्या बोलण्याने आनंद महिंद्रा प्रभावित झाले असून ‘मी रोज सराव करत असलेल्या गोष्टींचे मूल्यमापन करायला या मुलाने मला भाग पाडले आहे.’, असे ते म्हणाले आहेत.

१९ जानेवारीला आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, हा व्हिडिओ २०१८ सालचा आहे. मला वाटतं की हा मुलगा मोटिवेशनल स्पीकर प्रेम रावत यांना कोट करत आहे. म्हणूनच हा कोणीही बाल गुरु नाही. मात्र जेव्हा लहान मुलं बोलतात तेव्हा त्यांचा निरागसपणा त्यांच्या शब्दांमध्ये मिसळून जातो आणि त्याची एक वेगळीच छाप पडते. या मुलाने मी दररोज काय सराव करतो याचे मला पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडले आहे.

थेट प्रक्षेपणाच्यावेळी महिला पत्रकाराला कारने मारली धडक आणि…; Video Viral

या व्हिडीओमध्ये हा मुलगा इंग्रजीमध्ये विचारतोय – तर तुमच्यासाठी माझा आजचा प्रश्न असा आहे की तुम्ही रोज कोणत्या गोष्टीचा अभ्यास करता. कारण ज्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करता, त्यामध्ये तुम्ही पारंगत होता. तुम्ही जीवनात आनंदी राहण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी, खूष होण्यासाठी अभ्यास करता की तक्रार करण्याचा सराव करता? जर तुम्ही तक्रार करण्याचा सराव करत असाल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवाल. आणि यामध्ये तुम्ही इतके चांगले व्हाल की तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये कमतरता दिसेल. त्यामुळेच चांगल्या गोष्टींचा अभ्यास करा. जेणेकरून तुमचे आयुष्य आनंदी राहील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Influence of this little boy on anand mahindra learning how to be happy in life pvp

Next Story
स्वतःच्या सेल्फी विकून विद्यार्थ्याने कमावले ७ कोटी रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी