एसी कोच आणि स्लीपरची सुविधा असणाऱ्या काही भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये अनेकदा प्रवाशांच्या जेवणाची आणि झोपण्याची सोयही करण्यात येते. पण, तुम्ही कधी मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी खाण्याची सोय करण्यात आलेली पहिली आहे का? नाही; मग या व्हायरल व्हिडीओत ती तुम्हाला पाहायला मिळेल. काही तरुण ट्रेनमध्ये चढतात आणि धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना हॉटेलसारखी खाण्याची सोय करून देतात.
सोशल मीडियाचे काही इन्फ्लुएन्सर ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी खाण्याची सोय करतात. आधी एक जाहिरातसुद्धा तयार करतात आणि त्यावर मुंबई ट्रेनमध्ये खाण्याची विनामूल्य सोय करण्यात आली आहे, असे लिहिले होते. तसेच तरुण रेल्वेस्थानकावर आणि ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये या जाहिरातीचे वाटप करतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हॉटेलमधल्या वाढपी (वेटर) यांच्यासारखे पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून, ते तयार होऊन येतात. ते पाठीवर बॅग, हातात टेबल घेऊन ट्रेनमध्ये चढतात. ट्रेनमध्ये कशा प्रकारे प्रवाशांसाठी खास सोय करण्यात आली आहे हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.




हेही वाचा…लग्नाचा मांडव बनला आखाडा; भर मंडपातच तुंबळ हाणामारी अन् पुढे…चक्रावून टाकणारा Video
व्हिडीओ नक्की बघा :
प्रवाशांनी लुटला खास पदार्थांचा आनंद :
इन्फ्लुएन्सर दोन सीटच्या अगदी मधोमध एक टेबल ठेवून, त्यावर पांढरा कपडा घालतात आणि दोन प्रवाशांना तिथे बसवतात. दोन्ही प्रवासी अनोळखी असतात. तसेच इन्फ्लुएन्सरनी त्यांच्या घरून काही पदार्थ बनवून आणलेले असतात. ते पदार्थ ते बॅगमधून बाहेर काढतात आणि प्रवाशांच्या ताटात वाढतात. त्यात मॅगी, जिलेबी आदी पदार्थांचा समावेश असतो. तसेच हे पदार्थ खाल्ल्यानंतर दोन्ही प्रवासी इन्फ्लुएन्सर तरुणांचे भरभरून कौतुक करून, त्यांच्याबरोबर सेल्फीसुद्धा घेतात आणि शेवटी गोड पदार्थ एकमेकांना खाऊ घालतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @katariaaryan आणि @ sarthaksachdevva’s या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी ‘ही खूपच सुंदर कल्पना आहे’, असे कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. काही जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करीत ‘भावा विरार ट्रेनमध्ये अजिबात हे करण्याचा प्रयत्न करू नकोस’, असे आवर्जून सांगताना दिसत आहेत.