सोशल मीडियावर इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुधा मूर्ती या श्वानप्रेमी असल्याने त्यांनी घरी एक कुत्रा पाळला आहे. गोपी असं कुत्र्याचं नाव आहे. घरातील कुत्र्याचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ आहे. गोपीचा वाढदिवस त्यांनी घरातल्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. तसेच गोपी कुत्र्याचं औक्षणही केलं. एवढंच नाही तर ‘हॅप्पी बर्डथे टू यू’ असं गाणंही गात आहेत. तर गोपी कुत्राही प्रत्येक गोष्टीचं शांतपणे स्वीकार करताना दिसत आहे. सुधा मूर्ती यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गोपीच्या वाढदिवास साजरा केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपची सुरुवात सुधा मूर्ती आणि त्यांची बहीण आरतीचे ताट धरून आणि गोपीला तिच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देण्यापासून होते. क्लिप जसजशी पुढे सरकते तसतसे ते त्यांच्या कुत्र्याच्या कपाळावर टिका लावतात. ही क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर नेटीझन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि लेखिकेने तिच्या पाळीव प्राण्यावर एक पुस्तकही लिहिले आहे. “द गोपी डायरीज: कमिंग होम” ही बंगळुरूमधील गोपींच्या जीवनावरील तीन भागांची मालिका आहे. “मला प्राण्यांची आवड आहे. मी प्राण्यांसोबत वाढलो आणि पाळीव प्राणीही पाळले. जेव्हा गोपी आमच्या आयुष्यात आलो तेव्हा मला प्रश्न तपासण्याची संधी मिळाली, असं एका मुलाखतीत सुधा मूर्ती सांगितलं होते. “मुलांना प्राण्यांवर प्रेम करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.” असंही त्या पुढे म्हणाल्या होत्या.

सुधा मूर्ती या आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. पण त्यांची ओळख केवळ नारायण मूर्तीशी जोडलेली नाही, तर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इन्फोसिस बनवण्यात जेवढे योगदान नारायण मूर्तींचे आहे तेवढेच योगदान सुधा मूर्ती यांच्या त्याग आणि मेहनतीचे आहे. सुधा मूर्ती यांनी आतापर्यंत ९० हून अधिक भाषांमध्ये पुस्तके लिहिली आहेत.