Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. याचंच भयान वास्तव्य दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गरिबी ही एक शाप आहे ही फक्त पुस्तकी वाक्यं वाटावीत, पण वास्तवात या शब्दांचं भयाण रूप पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला ऊसाचा रस विकणाऱ्या विक्रेत्यासोबत अधिकाऱ्यांनी केलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही संतप्त होईल आणि आपली व्यवस्था, आपला समाज अशा प्रसंगी इतका उदासीन का असतो, असा प्रश्न विचारल्यावाचून राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऊसाचा रस विक्रेता रस्त्याच्या कडेला रस विकत असाताना काही अधिकारी तिथे येतात आणि त्याची गाडी उलटवण्याचा प्रयत्न करतात. त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत इथे का आला असं विचारत आहेत. यावेळी विक्रेता मी गरीब आहे मी जातो पुन्हा नाही येणार मला सोडा म्हणत विनवण्या करत आहे. तरीही त्यांना दया आली नाही. विक्रेता रडत रडत सांगण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तरीही त्यांना त्याची दया आली नाही. त्याच्या डोळ्यांतील अश्रू,या चेहऱ्यावरचा भेदरलेला भाव आणि गोंधळलेली मनस्थिती संपूर्ण समाजाला सवाल विचारते की आपल्याला हे वास्तव दिसतच नाही का? कारण त्याचा अपमान झाला नव्हता, तर समाजाच्या वागणुकीमुळे, उपेक्षेमुळे आणि गरिबीच्या जाळ्यामुळे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “गरिबी हा एक शाप आहे,” “शारीरिक त्रास देण्याचा अधिकार कोणालाच नाही,” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण घटनेने समाजाला अंतर्मुख होण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला धंदा करणारा व्यक्ती फक्त धंदा करत नव्हता, तर तो आपल्या आयुष्याचा लढा लढत होता. त्याच्यावर होणारा अन्याय म्हणजे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ zindagi.gulzar.h नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये, एका हृदयद्रावक क्लिपमध्ये एक रोजंदारी विक्रेता उसाचा रस विकून काही रुपये कमवण्याच्या आशेने आपल्या सायकलवरून येतो.पण गिऱ्हाईकांऐवजी त्याचा सामना महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी होतो. तणाव वाढताच तो रडू लागतो आणि वारंवार विनवणी करतो, “मी एक गरीब माणूस आहे… कृपया मला जाऊ द्या.”त्याच्या आर्त हाकेला कोणीही उत्तर देत नाही. चारी बाजूंनी घेरलेला आणि असहाय्य झालेला तो एकटा उभा राहतो – त्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.लोक रोज भूक आणि जगण्यासाठी बाहेर पडतात, निवडीने नाही. कायद्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक असू शकते, पण करुणा कधीही मागे सोडता कामा नये. असं लिहलं आहे.
