‘इन्स्टाग्राम डाऊन’ होताच ट्विटरवर Memes चा ‘हाहा’कार

सुमारे ४७ टक्के इस्टाग्राम वापरकर्ते अॅप योग्यरित्या वापरु शकत नाहीयेत तर २७ टक्के लोकांना अॅपच्या वेब व्हर्जनमध्येही समस्या येत आहेत.

Instagram is down
सकाळी १०.३५ वाजल्यापासूनच इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे ( Photo : Indian Express File Photo, Reuters )

अनेकांना इस्टाग्राम अॅप वापरण्यास अडचण येत आहे. इस्टाग्राम हे प्रसिद्ध अॅप काही तासांपासून डाऊन झाले आहे. याबद्दल ट्विटरवरील अनेक वापरकर्ते ट्विट करून तक्रार करत आहेत. काही लोकांनी नोंदवले की अॅप क्रॅश झाले आहे किंवा कोणतीही पोस्ट लोड करत नाहीये. काहींना मित्रांना थेट संदेश (DMs) पाठवण्यात समस्या येत आहेत. इन्स्टाग्रामने अद्याप यावर निवेदन जारी केलेले नाही.

अॅपकडून संदेश

बर्‍याच वापरकर्त्यांना अॅपवरुन एक संदेश देखील येत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की “आम्हाला माफ करा, पण काहीतरी चूक झाली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.” सध्या, इन्स्टाग्राममध्ये नक्की काय समस्या आहे हे स्पष्ट नाही. कंपनीने अद्याप त्रुटी आणि तपशीलांची पुष्टी केली नाही.

किती वापरकर्त्यांना येतेय अडचण?

डाउनटाइम ट्रॅकिंग साइट, डाउनडेटेक्टरनुसार, हजारो इस्टाग्राम वापरकर्त्यांना अॅपमध्ये समस्या येत आहेत. सुमारे ४७ टक्के इस्टाग्राम वापरकर्ते अॅप योग्यरित्या वापरु शकत नाहीयेत तर २७ टक्के लोकांना अॅपच्या वेब व्हर्जनमध्येही समस्या येत आहेत आणि २६ टक्के वापरकर्त्याना सर्व्हर कनेक्शनची समस्या जाणवत आहे.
डाउनटाइम ट्रॅकिंग साइट नुसार वापरकर्त्यांना सकाळी भारतीय वेळ १०.३५ पासून या त्रुटींना सामोरे जावे लागत आहे आणि अद्याप समस्या सुटली नाहीये. लोक सतत ट्विटरवर सांगत आहेत की त्यांना इन्स्टाग्राममध्ये समस्या येत आहेत.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

इन्स्टाग्राम डाऊन झाल्याचे समजल्यापासून नेटीझन्सने ट्विटरवर भन्नाट प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Instagram is down many users cant use app ttg

ताज्या बातम्या