instagram trending Video Sister in laws dance with her sisters husband went viral | Loksatta

Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’

‘मी देखील माझ्या दीदीच्या लग्नामध्ये असाच डान्स करणार’ अशी कमेंट एका मुलीने केली आहे.

Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’
एका मुलीने बहिणीच्या नवऱ्यासोबत केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. (Photo : Instagram)

सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. नवीन जमान्यातील नवीन ट्रेंडप्रमाणे आजकाल लग्न सराईमध्ये डान्स करण्याचा एक भन्नाट ट्रेंड आला आहे. यासाठी वधू-वरासह त्यांचे कुटुंबीयदेखील आपलं नृत्यकौशल्य दाखवण्यासाठी चांगलीच मेहनत घेत असल्याचं दिसून येतं आहे. शिवाय फक्त डान्स करणं नव्हे तर डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणे हा तर सर्वात मोठा ट्रेंड सध्या आला आहे. लोकांनी पोस्ट केलेले भन्नाट व्हिडीओ पाहायला नेटकरी देखील कंटाळत नाहीत.

सध्या अशाच एका लग्न सोहळ्यातील एका मुलीने बहिणीच्या नवऱ्यासोबत केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत असून या दोघांच्या डान्सवरून तुमची नजर हटणार नाही. या दोघांनी रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोणच्या ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातील ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ या गाण्यावर जोरदार डान्स केला आहे. रणबीर-दीपिकाने जशा स्टेप्स केल्या आहेत अगदी जशाच्या तशा स्टेप्स या व्हिडीओतील मुलीने आणि तिच्या बहिणीच्या नवऱ्याने केल्या आहेत.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मी आणि माझ्या दीदीचा नवरा लग्नामध्ये कसे नाचतो असं लिहिलं आहे. यो जोडीने आपल्या भन्नाट डान्समुळे लग्नाच्या पार्टीमध्ये एक नवा जोश आणल्याचं पाहायला मिळतं आहे. शिवाय हा डान्स जसा तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांना बघावासा वाटतं होता अगदी तसाच तो तुम्हालाही बघावासा वाटेल यात शंका नाही.

हेही पाहा- आजीबाईंच्या जिद्दीला सलाम! ८७ व्या वर्षी मिळवली ‘मास्टर्स डिग्री’; नेटकरी म्हणतायत, ‘वय म्हणजे केवळ आकडा’

व्हायरल होत असलेला हा मनोरंजक व्हिडिओ @shaadiii_byaah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत एक कॅप्शनही देण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘मी आणि ते’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. शिवाय या व्हिडीओचे क्रेडिट @bear_ly_loving नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटला देण्यात आलं आहे. तर ही जोडी खूप छान आहे अशी कमेंट एका नेटकऱ्यांने व्हिडीओला दिली आहे. तर ‘मी देखील माझ्या दीदीच्या लग्नामध्ये असाच डान्स करणार’ अशी कमेंट एका मुलीने केली आहे. शिवाय हा व्हिडीओ आत्तापर्यंत तब्बल १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 10:35 IST
Next Story
आजीबाईंच्या जिद्दीला सलाम! ८७ व्या वर्षी मिळवली ‘मास्टर्स डिग्री’; नेटकरी म्हणतायत, ‘वय म्हणजे केवळ आकडा’