Instant Karma Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात, काही आश्चर्यचकित करतात, तर काही धक्का देऊन जातात. अशाच एका व्हिडीओची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. वरकरणी हा एक साधा, मजेशीर क्षण वाटतो; मात्र पुढे जे घडतं ते पाहून “जशी करणी तशी भरणी” याची जाणीव लगेच होते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा शांतपणे रस्त्याच्या कडेला बसलेला दिसतो. तो पूर्णपणे निवांत आणि निष्काळजी अवस्थेत असतो, इतक्यात एक व्यक्ती तिथे येते आणि त्या कुत्र्याजवळ जाऊन त्याला प्रेमाने उचलून घेते. सुरुवातीला सगळं काही सामान्य आणि निरुपद्रवी वाटतं, पण पुढच्या क्षणी ती व्यक्ती कुत्र्यासोबत ‘मजा’ करण्याच्या नादात त्याला हातात धरून गोल-गोल फिरवू लागतो.

कुत्र्याला चक्कर येईल, तो घाबरेल किंवा मजा येईल असा कदाचित त्या व्यक्तीचा उद्देश असावा. मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं. ती व्यक्ती जितक्या वेगाने फिरते, तितक्याने तिचाच तोल बिघडू लागतो. काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे उलटते. कुत्र्याला काही होण्याआधीच त्या व्यक्तीलाच प्रचंड चक्कर येते आणि ती व्यक्ती थेट मागे असलेल्या नाल्यात जाऊन कोसळते!

हा संपूर्ण प्रसंग इतका अचानक घडतो की पाहणाऱ्यांनाही धक्का बसतो. काही क्षणांपूर्वी दुसऱ्याची थट्टा करणारा माणूसच स्वतःच्या कृतीचा फटका बसून खाली पडतो, त्यामुळेच हा व्हिडीओ ‘इन्स्टंट कर्मा’चा उत्तम नमुना म्हणून पाहिला जात आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी तो पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेवर विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्यातून धडा घेण्याचा सल्ला दिला.

एका युजरने लिहिलं, “यालाच म्हणतात जशी करणी तशी भरणी.” दुसऱ्या युजरने मजेशीर टिप्पणी करत म्हटलं, “हे तर कर्मासोबत बोनस पॅक आहे!” तर तिसऱ्या युजरने स्पष्ट शब्दांत लिहिलं, “अशा मूर्खपणाच्या खेळांचे शेवट नेहमीच वाईट होतात.”

या व्हिडीओमधून एक महत्त्वाचा संदेशही समोर येतो, प्राण्यांशी खेळताना किंवा त्यांच्याशी वागताना संवेदनशीलता आणि जबाबदारी आवश्यक असते; केवळ मजा म्हणून केलेली कृती कधी कधी स्वतःलाच महागात पडू शकते, त्यामुळेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा घटनांकडे फक्त मनोरंजन म्हणून न पाहता त्यातून योग्य धडा घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

येथे पाहा व्हिडीओ