scorecardresearch

International Youth Day 2022: आजच्या दिवशीच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय युवा दिवस? पहा यंदाची थीम

मागील २२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.

International Youth Day 2022: आजच्या दिवशीच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय युवा दिवस? पहा यंदाची थीम
International Youth Day 2022 (फोटो: संग्रहित)

कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीच्या हातात असते असं म्हणतात कारण प्रत्येक उद्या घडवण्यासाठी हेच हात आज झटणारे असतात. आयटी पासून ते आर्मी पर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संकल्पनांचे योगदान देण्याचे काम ही पुढची पिढी करत असते. या समर्पणाला प्रोत्साहित करण्यासाठी मागील २२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने १७ डिसेंबर १९९९ मध्ये इंटरनॅशनल युथ डे साजरा निर्णय घेतला होता मात्र या दिवसासाठी १२ ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली हे तुम्हाला माहीत आहे का? आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व, यंदाची थीम व इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२२ थीम

यंदाचा आंतरराष्ट्रीय युवा दिन इंटरजनरेशनल सॉलिडॅरिटी म्हणजेच सर्व पिढ्यांमधील सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी एक जग तयार करणे या थीम वर आधारीत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वेक्षणानुसार ६ ते १३ या वयोगटात आर्थिक, कौटुंबिक बाबींमुळे अनेकांना शिक्षण घेणे शक्य होत नाही.गणिताची कौशल्ये व सामान्य ज्ञानाच्या अभावी प्रत्यक्ष कामात तरबेज असूनही असे तरुण भविष्यात मागे पडतात. यावर तोडगा शोधण्यासाठी यंदाचे आंतरराष्ट्रीय युवा दिन सेलिब्रेशन समर्पित असणार आहे.

आंतरराष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू हा तरुणांना सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवर बोलते करणे हा आहे. समाजातील अगदी तळागाळात काम करणाऱ्या तरुणांचा सन्मान करून त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर कामाची पोचपावती द्यावी व यातून इतरांसाठी प्रेरणा मिळावी यासाठी म्हणूनही हा युवा दिन साजरा केला जातो.

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजावंदनात असतो ‘हा’ मोठा फरक; UPSC च्या मुलाखतीत फक्त दोघांना जमलं उत्तर

दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाने १७ डिसेंबर १९९९ ला आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरुणांचा विकास (युथ डेव्हलपमेंट) खात्याच्या मंत्र्यांनी जागतिक परिषदेत तरुणांसाठी एक दिवस समर्पित करण्याची सूचना केली होती, संयुक्त राष्ट्राने ही सूचना स्वीकारल्यावर पहिल्यांदा साल २००० मध्ये आंतराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.