राणू मंडलने गायलं ‘Kacha Badam’ गाणं, VIRAL VIDEO पाहिल्यानंतर लोक म्हणाले, ‘सगळा मूड खराब केला’

सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बादाम’ गाण्याची बरीच क्रेझ आहे. नुकतंच राणू मंडल यांनी सुद्धा हे गाणं गायलंय. परंतू या गाण्यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या आहेत.

Ranu-Mondal-Sings-Kacha-Badam
(Photo: Instagram/ shiney_girl78)

सोशल मीडिया एक असं व्यासपीठ आहे जिथे लोक रातोरात स्टार बनतात. इथे सर्व प्रकारचे व्हिडीओ वारंवार व्हायरल होतात, जे लोकांना खूप आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बंगाली माणूस स्वतःच्या स्टाईलमध्ये गाणे गाऊन बदाम विकत आहे. आता हे गाणं सोशल मीडियावर इतकं प्रसिद्ध झालं आहे की लोक या गाण्यावर आपले वेगवेगळे डान्स व्हिडीओ देखील शेअर करताना दिसून येत आहेत. तर काही लोक हे गाणे गाऊन स्वतःला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. राणू मंडलचे नाव तुम्ही ऐकलं असेलच. त्यांचा आता एक नवा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या खास स्टाइलमध्ये ‘कच्चा बदाम’ गाणं गाताना दिसत आहे.

दोन वर्षापुर्वी लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गावून रातोरात स्टार बनलेल्या राणू मंडल आता पुन्हा चर्चेत आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा बदाम’ या गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. राणू मंडलने यांनी हे गाणे अगदी सुरात आणि लयीत गाण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यांचा हा नवा व्हिडीओ लोकांना अजिबात आवडलेला नाही. लोकांनी त्यांच्या गाण्याची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर shiney_girl78 नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी विविध मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा : ‘Kacha Badam’ गाण्याची क्रेझ थेट टांझानियापर्यंत पोहोचली…, ‘त्या’ तरूणाचा डान्स होतोय VIRAL

एका यूजरने ‘थांबा’ असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या यूजरने ‘तौबा तौबा… सगळा मूड खराब केला’ अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिले आहे की, ‘अरे भावांनो, मला मारून टाका यापेक्षा…’. वेगवेगळ्या कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर राणू मंडल यांना ट्रोल करण्यात सुरूवात केलीय. राणू मंडलचं हे गाणं ऐकून अनेक युजर्सनी तर ‘कच्चा बदाम’ या गाण्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “RIP Badam song.” असं लिहिलत अनेकांनी गाण्यावर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

आणखी वाचा : Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL; माउथ ऑरगनने गाणं वाजवून झाला देशभरात फेमस!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘त्या’ एअर होस्टेसवरही चढला ‘पुष्पा’ फिवर, ‘सामी सामी’ गाण्यावर केला रश्मिकापेक्षाही भन्नाट डान्स

राणू मंडल यांच्या नव्या गाण्याचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये राणू मंडलने स्वेटर परिधान केलेलं दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मुलीसमोर मोठ्या फुशारक्या मारत होते तरूण, मग खिशातून नाणं पडलं आणि…

रेल्वे स्टेशनवरून अचानक प्रसिद्ध झालेली आणि चित्रपटाच्या सेटवर पोहोचलेली राणू त्यांच्या एका चाहत्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये रानूविरोधात संताप पाहायला मिळाला. लोक राणूला गर्विष्ठ असल्याचे सांगू लागले. यामुळेच यावेळी युजर्स राणू यांचे व्हिडीओ पूर्वीसारखे लाइक होत नाहीये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Internet sensation ranu mondal sings trending bengali song kacha badam in viral video gets trolled prp

Next Story
Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL; माउथ ऑरगनने गाणं वाजवून झाला देशभरात फेमस!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी