Premium

Apple iPhone 15 ची विक्री सुरू होताच मॉलमध्ये चेंगराचेंगरी; लोकांना रोखताना सुरक्षा रक्षकांना फुटला घाम; VIDEO व्हायरल

सर्वांत आधी नवीन आयफोन मिळवायला लोकांचा ‘मोठा संघर्ष’

iPhone 15 Frenzy: Videos Show Huge Crowd Rushing At 6 AM In Dubai Mall To Grab The Gadget First
iPhone 15 ची विक्री सुरू होताच दुबई मॉलमध्ये चेंगराचेंगरी

Apple iPhone 15 : अ‍ॅपल आयफोन १५ सीरीज भारतात लाँच झाली आहे. ह्या सीरीजमध्ये चार मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. ह्या लाँच इव्हेंटपूर्वी अनेक बातम्या आल्या होत्या की यावेळी iPhone १५ भारतात बनवला जात आहे. त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की यंदा स्वस्तात iPhone १५ ची विक्री होईल. परंतु असं काहीच घडलं नाही त्यामुळे अनेक आयफोन प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या फोनची प्रचंड क्रेझ आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक आयफोन १५ ची विक्री सुरू होताच प्रथम खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये गर्दी गोंधळ करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबईत मॉलमध्ये सकाळी ६ वाजता गर्दी

दरम्यान असाच एक दुबईतला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याठिकाणी लोकांची गर्दी कंट्रोल करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मध्यस्ती करावी लागली. दुबई मॉलमध्ये सकाळी ६ वाजता जेव्हा आयफोन १५ ची विक्री सुरू झाली आणि मॉलचे दरवाजे उघडले, तेव्हा बाहेर थांबलेल्या लोकांनी लगेचच खरेदीसाठी पळापळ सुरु केली. व्हायरल व्हिडीओमध्येही लोक दुकानाकडे धावताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अॅपल स्टोअरच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे तुम्ही पाहू शकता. लोक एकमेकांना धक्काबुक्की करत आहो.

सकाळपासून स्टोअर्सवर आयफोनची डिलिव्हरी आणि विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे.पहिल्याच दिवशी ज्यांना आयफोन मिळाला त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. iPhone 15 ची विक्री सुरू होण्याच्या एक दिवस आधी दुबई मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मोठ्या संख्येने लोक दुकानाकडे येताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाहिले तेव्हा तेही घाबरले. भारतात आयफोन १५ची किंमत ८०हजार ते १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक वेळी नवीन फोन आल्यावर तो सर्वांत आधी विकत घेण्यासाठी जगभरात अशा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” बाळाच्या फोटोशुटसाठी पप्पांची धडपड, VIDEO होतोय तुफान व्हायरल

दुबईत भारतापेक्षा स्वस्त आयफोन

खरं पाहत आयफोन भारतातच बनतात, परंतु भारतात बनून देखील इथे ते दुबईपेक्षा महागात विकले जातात. हा फरक थोडाथोडका नसून खूप मोठा आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सची भारतातील किंमत दुबईपेक्षा सुमारे ४६ हजार रुपयांनी जास्त आहे. त्यामुळे लोकांनी तिकडे गर्दी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Iphone 15 frenzy videos show huge crowd rushing at 6 am in dubai mall to grab the gadget first srk

First published on: 27-09-2023 at 12:54 IST
Next Story
माजी विद्यार्थ्याचा अनोखा पराक्रम! ज्या शाळेत शिकले त्याच शाळेची जमीन विकली, संपूर्ण प्रकरण वाचून डोकंच धराल