iPhone 16 Series First Indian Ad for Apple : तंत्रज्ञान जगतासाठी आज, ९ सप्टेंबर हा खूप खास दिवस आहे. कारण जगातील आघाडीची मोबाईल कंपनी ॲपल आज आयफोन १६ सीरिज (iPhone 16) लाँच करत आहे. ॲपलच्या iPhone 16, 16 Plus, 16 Pro आणि 16 Pro Max अशी चार सीरिज आज लाँच होत आहेत. आयफोन १६ चे हे नवे व्हर्जन विकत घेण्यासाठी भारतासह परदेशातही लोकांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येणार आहे. पण आयफोन १६ लाँच होण्याआधी सोशल मीडियावर सध्या ॲपल कंपनीची भारतातील सर्वात पहिल्या आणि २८ वर्षे जुन्या जाहिरातीचा (Apple Ad Viral) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या जाहिरातीत अभिनेता समीर सोनी दिसत आहे, जो ॲपल कंपनीच्या एका डिव्हाइसची जाहिरात करताना दाखवण्यात आला आहे.

Read More Apple Event 2024 Live Updates : Apple iPhone 16 Launch Event 2024 : अवघे काही तास! ॲपल इव्हेंट येथे पाहता येणार लाईव्ह; आयफोन १६ सह ‘ही’ दोन प्रोडक्ट होणार लाँच

Manu Bhaker Ramp Walk Video Viral i
Manu Bhaker : मनू भाकेरच्या रॅम्प वॉकसमोर मॉडेल्सही पडतील फिक्या, लॅक्मे फॅशन वीकमधील VIDEO होतोय व्हायरल
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
rbi repo rate
RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!
PM Modi congratulates Israel's Netanyahu X
इस्रायल भारताबरोबर आहे का? ‘त्या’ वादग्रस्त नकाशावरून टीकेनंतर नेतान्याहू सरकार म्हणाले “आम्ही तातडीने…”
Gunratna Sadavarte in Bigg Boss Hindi 18
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉस हिंदीमध्ये दिसणार; स्पर्धकांशी वाद झाल्यावर केसेस करणार का? म्हणाले…
Natasa Stankovic Hardik Pandya Ex Wife Swimming Pool Video with Serbian Model Aleksandar Alex Ilic Goes Viral on Instagram
Natasa Stankovic: हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशा दिसली ‘या’ मॉडेलबरोबर, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO
Google Trending Personal Loans in Marathi
Personal Loans : भारतात पर्सनल लोनच्या मागणीत प्रचंड वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज? वाचा सविस्तर
BMW has launched the all-new F900 GS and GS Adventure bikes with exciting features
भन्नाट फीचर्ससह BMW च्या ‘या’ दोन दुचाकी भारतात लाँच! किंमत किती? जाणून घ्या

ॲपलची भारतातील पहिली जाहिरात तुम्ही पाहिलीय का?

ही जाहिरात Apple Macintosh (Windows Disk Feature) ची होती. या व्हिडिओमध्ये अभिनेता समीर हा कार्यालयातील कर्मचारी दाखवण्यात आला आहे, यावेळी त्याचा बॉस त्याला ॲपल कंपनीचे मॅकिंटॉश डिव्हाइस त्याच्या पर्सनल कॉम्प्युटरवर वापरण्यास सांगतो, यानंतर समीर बॉसकडून ती डिस्क घेतो आणि कॉम्प्युटरमध्ये टाकतो आणि मग त्याच्या कॉम्प्युटरचा स्पीड, फीचर पाहून तो आश्चर्यचकित होतो. ‘हे जास्त काम करते, त्याची किंमतही कमी आणि वापरायलाही अगदी सोपे आहे’ या टॅगलाइनने ही जाहिरात संपते. ९० च्या दशकातील ही जाहिरात Apple ची भारतातील पहिली जाहिरात आहे, जी या आयफोन १६ सीरिजच्या रिलीजपूर्वी व्हायरल होत आहे. जी पाहिल्यानंतर अनेकांना आपले जुने दिवस आठवत आहेत.

आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ॲपलच्या भारतातील पहिल्या जाहिरातीच्या या व्हिडिओवर अनेक यूजर्सही कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर Apple प्रोडक्टच्या किंमती वाढत आहेत.’ आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘आजकालच्या मुलांना प्रश्न पडला असेल की, तेव्हा लोक सेव्ह आयकॉन खिशात का ठेवायचे?’ आणखी एका युजरने लिहिले आहे की,’बघा आज तंत्रज्ञान कुठून कुठवर पोहोचले आहे.’ त्याचबरोबर अनेक युजर्सनी लिहिले आहे की, ‘ऍपल कंपनी दरवर्षी एक-दोन ऍडव्हान्स फिचर अॅड करून नवीन सीरिज लाँच करत आहे.’