Viral video: आयफोन ही आजकाल तुमच्यापैकी बहुतेकांची पसंती असेल. पण आयफोनची किंमत जास्त असल्यामुळे तो प्रत्येकजण खरेदी करू शकत नाही. मात्र, या फोनचं आकर्षण अनेकांना असतंच. अ‍ॅपल आयफोन वापरण्याचे स्वप्न बऱ्याच जणांचं असतं. कारण हा फोन सर्वात टिकाऊ मानला जातो. अनेकदा पाण्यात पडल्यानंतरही हा फोन खराब होत नसल्याचं तुम्ही ऐकलं असेल. दरम्यान हाच आयफोन फ्रीमध्ये मिळत असेल तर? एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये आयफोनने भरलेला कंटेनर समुद्रात उलटा झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आयफोन आहेत. याच आयफोनवर दुसऱ्या बोटीतील लोक अक्षरश: तुटून पडले आहेत. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून तो आता व्हायरल होत आहे.

समुद्रात आयफोनचा कंटेनर पलटी

चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. चोरीचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी रात्रीच्या वेळी गुपचूप लपून चोरी करताना, कुणी दिवसाढवळ्या नजर चुकवून चोरी करताना, तर कुणी रस्त्याने चालता चालता चोरी करताना दिसलं. पण सध्या चोरीचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. यामध्ये कुणी एक दोन चोर नाहीत तर संपूर्ण बोटीतील लोक आयफोनवर डल्ला मारताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या बोटीतील लोक समुद्रात उलटा झालेल्या कंटेनरमधून आयफोन काढण्यासाठी धडपड करत आहेत. सगळेजण आयफोन घेण्यासाठी तुटून पडले आहेत. यावेळी ते स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी करत नाहीयेत. समोरच्या कंटेनरमधून कोणी एक आयफोनचा बॉक्स उचलत आहे तर कुणी चार चार, यावेळी बरेच आयफोनचे बॉक्स खाली पाण्यातही पडत आहेत. समुद्र मधेच खवळलेलाही दिसत आहे. त्यामुळे पाणी वर येतंय, बोट हलतेय. तरीही लोक कंटेनरमधून आयफोन घेण्यासाठी गर्दी करत धडपड करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: गिफ्ट देण्यासाठी एक्स बॉयफ्रेंड स्टेजवर आला; पुढच्याच क्षणी नवरदेवावर चाकूने हल्ला; यावेळी नवरीनं काय केलं पाहा

हा व्हिडीओ momentum_.success नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हंटलय, माणसाची नियत कधीही बदलू शकते. तर दुसरा म्हणतो “जान चली जाए लेकिन फोन नही इंडिया के लोगों की सोच.”