IPL 2022: गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर मेगा फायनलमध्ये आमनेसामने आले. सुमारे १ लाख ३० हजार लोक बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. बीसीसीआयने या मेगा इव्हेंटचा समारोप सोहळा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. एआर रहमान (A. R. Rahman) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. रणवीर सिंगने काही अप्रतिम डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तर एआर रहमान यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रहमान यांच्या गाण्याचा एक लाखांहून अधिक लोकांनी आनंद लुटला. ‘वंदे मातरम’ (Vande Mataram )गाण्यावर जमाव डोलत होता. जवळपास एक लाख लोकांनी ‘वंदे मातरम्’ हे गाणे एकत्र गायले जे भारतीय चाहत्यांसाठी भावनिक आणि नेत्रदीपक दृश्य होते. अशा पद्धतीने ‘वंदे मातरम्’ गाण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नसावी.

(हे ही वाचा: Photos: १ लाख १०००० आसनं, ३००० कार, १० हजार बाईक पार्कींग; असं आहे IPL फायनल होणारं नरेंद्र मोदी स्टेडियम)

(हे ही वाचा: IPL 2022: १५ वर्षानंतरही RCB विजयाच्या प्रतिक्षेत; एकट्या कोहलीवर १५० कोटी तर संपूर्ण टीमवर तब्बल ९०० कोटींचा खर्च)

‘असा’ रंगला सामना

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने सर्वात जास्त तीन गडी बाद केले. त्यामध्ये जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायर या स्फोटक फलंदाजांचा समावेश होता. साई किशोरने दोन तर शामी, यश दयाल आणि राशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत आपल्या कर्णधाराला पुरेपुर मदत केली होती. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात गुजरातच्या संघाचा नव्यानेच समावेश करण्यात आला होता. आपल्या पदापर्णाच्या हंगामात विजेतेपद मिळवून गुजरात टायटन्सने सर्वांची ‘वाहवा’ मिळवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 final over 1 lakh people singing vande mataram will give you goosebumps viral video ttg
First published on: 30-05-2022 at 10:41 IST