आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल आहे. IPL च्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातही आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईने शेवटच्या षटकातील दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजा स्ट्राईकवर होता. यावेळी त्याने शेवटच्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकल्यामुळे आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात चेन्नई सुपर किंग्ज यशस्वी ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसकेने आयपीएलची ट्रॉफी जिंकताच संपुर्ण स्टेडीयमवर प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली. काही चाहत्यांना इतका आनंद झाला की त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशा एका CSK चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.मात्र हा व्हिडिओ सीएसकेच्या कालचा अंतिम सामना जिंकण्यापुर्वीचा आहे. ज्यामध्ये CSK ची जर्सी घातलेली मुलगी रडताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘CSK ने हा विजय केवळ यासाठीच मिळवला आहे. CSK चे अभिनंदन. व्हिडिओ शेअर झाल्यापासून आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण तो शेअर करत आहेत. व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही पाहा- CSK vs GT वेळी महिला व पोलीसांमध्ये तुफान राडा; आधी ढकललं, कानाखाली मारली मग…Video पाहून लोकांचा संताप

एका यूजरने लिहिले आहे, “भाऊ, हे पाहून मला रडू आले.” तर दुसरऱ्याने लिहिलं आहे, “या मुलीला ट्रॉफीसोबत फोटो काढू द्या.” तर तिसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, ‘व्वा, किती मोठा चाहता आहे.’ तर आणखी एकाने हा सामना जिंकल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नसेल असं लिहिलं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी जडेजाने या मुलींच्या अश्रूंना न्याय दिल्याचं म्हटलं आहे.

हेही पाहा- धोनी व पांड्याच्या फॅन्सला विराट कोहलीचा मोठा आधार; स्टेडियममध्ये भरपावसातील ‘तो’ Video पाहून व्हाल खुश

कालच्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

आयपीएलचा अंतिम सामना रविवारी होणार होता, परंतु पावसामुळे तो राखीव दिवशी म्हणजेच काल २९ मे रोजी खेळवण्यात आला. सोमवारी धोनीने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला फलंदाजी करण्यास सांगितले. फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत २१४ धावा केल्या. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी केली. पहिल्या तीन चेंडूंवर संघाने चार धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना विस्कळीत झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला आणि सामन्यातील ५ षटके कमी करण्यात आली. आता संघाला १५ षटकात १७१ धावा करायच्या होत्या. नंतर झालेल्या खेळीत संघाने पाच विकेट्स गमावून सामना आणि विजेतेपद दोन्ही जिंकले. पण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गुजरात जिंकेल असं वाटत असताना जडेजाने सामना सीएसकेच्या नावावर केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 craze of chennai super kings the girl started crying in the last match emotional video went viral jap
First published on: 30-05-2023 at 11:15 IST