IPL 2024 : सध्या देशभरात आयपीएलची क्रेझ पाहायला मिळतेय, प्रत्येक जण आपल्या आवडत्या संघाचा लाईव्ह सामना पाहण्यासाठी संध्याकाळची वाट पाहत असतो. यात सध्या सोशल मीडियावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीसंदर्भात दोन बॅनरचे फोटो व्हायरल होत आहेत. या बॅनरमधून लखनौच्या चाहत्यांनी धोनीकडे एक खास मागणी आणि इच्छा व्यक्त केली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धोनीच्या चाहत्यांनीही त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. पण, या बॅनर्सवर नेमके काय लिहिले आहे आणि धोनीचे चाहते काय कमेंट्स करत आहेत पाहू….

धोनीसाठी खास चौका-चौकात लावले बॅनर

सध्या सोशल मीडियावर दोन बॅनरचे फोटो व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोतील बॅनरवर लिहिले आहे की, “धोनीने चांगले खेळावे आणि मॅच एलएसजीने जिंकावी, असे आम्हाला वाटते.” दुसरा फोटो लखनऊ सुपर जायंट्सच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेल्या बॅनरवर लिहिले आहे की, “जेव्हा शेवटच्या बॉलवर विजयासाठी १२ धावांची गरज असेल तेव्हा धोनीने षटकार मारावा.” या दोन्ही बॅनरच्या कोपऱ्यात सामना क्रमांक लिहिला आहे. १९ एप्रिल रोजी चेन्नई आणि लखनऊ यांच्यात ३४ वा सामना खेळवला जाणार आहे, म्हणून ३+४=७ असे लिहून ते ‘Thala for a reason’ असे लिहिले आहे.

Yash Dayal magical comeback in IPL 2024
VIDEO : यश दयालने आपल्या कमबॅकचे श्रेय ‘या’ खेळाडूला दिले, सिराजशी बोलताना केला खुलासा
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
mmrda helps bmc to remove 3 advertisement hoardings
घाटकोपरमधील तीन जाहिरात फलक हटविण्यासाठी एमएमआरडीएचा पालिकेला मदतीचा हात
a couple mentioned 15 rules in wedding card for guest
“लग्न आमचे आहे, तुमचे नाही” लग्नाच्या पत्रिकेत लिहिले पाहूण्यांसाठी १५ नियम, एकदा क्लिक करा अन् नीट बघा
A Gentleman suggested men to say i love you to their wife and express love
VIDEO : “बायकोला I Love You म्हणा..” प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण कंजूसपणा का करतो? काकांनी दिला पुरुषांना सल्ला
How To burn calories 24 Hours lose weight Even while resting
२४ तास कॅलरीज बर्न होतील, आराम करतानाही! फक्त दिवसातून ‘या’ ५ हालचाली करा! डॉ. मेहतांनी सांगितला फंडा
do you have Leg Cramps in night
Video : रात्री झोपताना खूप पाय दुखतात? मग हे व्यायाम करा, व्हिडीओ एकदा बघाच
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही? जिवलग मित्र सुरेश रैना एकाच शब्दात म्हणाला…; पाहा VIDEO

हा फोटो पाहिल्यानंतर धोनीच्या चाहत्यांनीही कमेंट करायला सुरुवात केली आहे. लखनऊच्या अधिकृत हँडलवरून शेअर केलेल्या फोटोवर बहुतेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, …आणि त्याचा शेवट नो-बॉलने होणार. दुसऱ्या युजरने लिहिले की, शेवटचा चेंडू नो बॉल असावा. आणखी एका युजरने लिहिले की, तो धोनी आहे, तो शेवटच्या चेंडूवर १२ धावाही काढू शकतो.