MI vs KKR Viral Video: क्रिकेट हा जगभरातील लोकांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट स्टेडियमध्ये बसून प्रत्यक्षात सामना बघण्यासाठी कित्येत क्रिकेट प्रेमी उत्सूक असतात पण काही लोक क्रिकेट सामाना बघण्यासाठी क्रिकेट स्टेडियमध्ये येतात कारण त्याना टिव्हीवर झळकायचे असते किंवा फ्लिमी स्टाईलमध्ये आपल्या पार्टनरला प्रपोज करायचे असते. अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही हा सीन पाहिला असेल जो प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. सोशल मीडियावर अशा प्रसंगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान अशाच एका स्टेडियममध्ये प्रपोजलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. प्रपोज करण्यआधीच असे काही घडले जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

जसा क्रिकेटमध्ये कॅच करण्याआधीच बॉल हातातून सुटला तर आख्खा सामना फिरतो, त्याचप्रमाणे जर प्रपोज करताना अंगठी पडली तर…..कल्पना करूनच तुमच्या हृदयाचे ठोकेच वाढले ना. व्हायरल व्हिडीओमधील जोडप्याबरोबर अगदी असाच एक मजेशीर प्रसंग घडला. मुंबईतील स्टेडियममध्ये गर्लफ्रेंडला प्रपोज करताना बॉयफ्रेंडच्या हातातून अंगठी पडली. पुढे काय घडले ते जाणून घेण्याच्या उत्सूकतेमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्टेडीयममध्ये प्रेमाचा क्षण, पण अचानक वाढला सस्पेन्स (Proposal Moment Turns Into Suspense)

मुंबईतील वानखेडे स्टेडीयम येथे IPL 2026 चा मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडा यांच्यातील सामना रंगला होता. सामना रंगात असतानाच स्टँडमध्ये एक वेगळाच प्रंसग घडला. मुंबई इंडियन्सचा एक चाहता आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी अचानक एका गुडघ्यावर बसला. गर्लफ्रेंडला या प्रपोजलबद्दल काहीच माहित नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसत होता. ती कोलकाता नाइट रायडर्सची चाहती असल्याने हा क्षण आणखी मजेशीर ठरला. ती प्रपोजला उत्तर देणा त्यापूर्वीच अचानक त्याच्या हातातून एंगेजमेंट रिंग खाली पडली आणि काही सेकंदांसाठी संपूर्ण वातावरणात सस्पेन्स निर्माण झाला. अंगठी हरवली का? अंगठी कुठे गेली? आता पुढे काय होणार? हे सर्वांच्या मनात सुरु असताना आसपास बसलेले लोकही तात्काळ अंगठी शोधण्यासाठी सीट्स आणि पायऱ्या तपासू लागले.

काही सेकंदांचा थरार अन् अखेर शेवट झाला गोड (Ring Found And Proposal Completed)

काही क्षण सगळ्यांचेच श्वास रोखले गेले होते. प्रपोजलचा रोमँटिक क्षण अचानक अंगठी शोधण्यात हरवून गेला होता. मात्र थोडा वेळ शोधल्यानंतर अंगठी सापडली आणि पुन्हा एकदा तो चाहता गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना दिसला.

हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर शेअर होताच काही मिनिटांत व्हायरल झाला.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया (Netizens React With Humor)

हा व्हिडिओ शेअर करताना Kolkata Knight Riders च्या अधिकृत हँडल व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत या प्रसंगाचा आनंद घेतला.

एका यूजरने लिहिले,“एक सेकंदासाठी त्याचं जीव कंठाशी आला असेल!”

दुसऱ्या यूजरने मजेत कमेंट केली,“इथेही MI जिंकलीच!”

तर आणखी एका यूजरने लिहिले, “किमान एक तरी KKR फॅन त्या रात्री खुश होता.”

मैदानावरही रंगला हायस्कोरिंग थरार (High-Scoring Match Adds To Drama)

या रोमँटिक ड्रामासोबतच मैदानावरही जोरदार सामना पाहायला मिळाला. २२१ धावांचे लक्ष्य गाठताना, मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांच्या सलामीच्या भागीदारीने दमदार सुरुवात केली, ज्यांनी मिळून १४८ धावा केल्या आणि सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. मुंबईने सहा गडी राखून आणि पाच चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करून विजय मिळवला. MI चा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेच्या KKR विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.