scorecardresearch

गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहला ‘हा’ IPS अधिकारी, हा पराक्रम करणारा पहिला व्यक्ती ठरला

IPS अधिकाऱ्याचा रोमांचक पराक्रम! गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहण्याचा केला विक्रम

rishna Prakash
कृष्णप्रकाश यांनी ही मोहीम ‘बुडणे प्रतिबंधक जनजागृती’ला समर्पित केली (Source: Krishna Prakash)

Amazing Viral Video: रोमांचक आणि साहसी खेळांची आवड असलेले लोक जगभर मोठे पराक्रम करताना दिसतात. नुकतेच IPS अधिकारी कृष्ण प्रकाश प्रसाद यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुहेपर्यंत पोहण्याचे अवघड काम पूर्ण करुन त्यांनी नवा पराक्रम केला आहे. १०किमी ओपन स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळविण्याकरिता तरुणांना प्रेरणा देण्यासाठी, तसेच ‘बुडणे प्रतिबंधक जनजागृती’ मोहिमेचा एक भाग म्हणून,त्यांनी हा प्रयत्न केला.

२६ मार्चला रविवारी सकाळी ७.४५ला त्यांनी समुद्राच्या खळखळत्या लाटांच्या प्रवाहाविरोधात IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी गेटवे ऑफ इंडियापासून पोहण्यास सुरु केले. एलिफंटा लेणीपर्यंत जवळपास १६.२० किलोमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या ५ तास २६ मिनिटांत पूर्ण केले. विशेष म्हणजे असा पराक्रम करणारे ते इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

लाटांवर पोहून IPS अधिकाऱ्याने रचला इतिहास

आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी ट्विटरवर ही माहिती आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर केली. यासोबतच त्याने आपल्या पराक्रमाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हे ट्विट व्हायरल झाले आणि त्याला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. व्हिडिओमध्ये, कृष्ण प्रकाश मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून समुद्रात उडी मारून पोहायला सुरुवात करताना आणि एलिफंटा लेणीजवळ संपवताना दिसत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

आपले ध्येय साध्य करून इतिहास रचल्यानंतर कृष्ण प्रकाश खूप आनंदी दिसत होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओला 1.3 दशलक्षहून अधिक व्ह्यूज आणि १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून यूजर्स त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीचे सतत कौतुक करताना दिसत आहेत. इतिहास रचल्याबद्दल बहुतेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनी केले कौतुक

आयपीएस दीपांशु काबरा यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “अभिनंदन.”

आयपीएस सुकीर्ती माधव मिश्रा यांनीही यावर कमेंट केली. त्यांनी लिहिले, “सर हे अविश्वसनीय आहे. अभिनंदन सर.

आग्रा एडीजी राजीव कृष्णा यांनीही या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “अद्भुत कामगिरी.”

एका ट्विटर युजरने पोस्ट केले, “हे प्रशंसनीय आहे, प्रिय श्री कृष्णाजी! हार्दिक अभिनंदन! तुमची ही कामगिरी लाखो लोकांना महान जलतरणपटू होण्यासाठी आणि पाण्याच्या भीतीवर मात करण्यासाठी प्रेरणा देईल!”

दुसर्‍याने लिहिले, “आश्चर्यकारक सर… लाटांवर पोहणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे..तुम्हाला आणखी शक्ती मिळो…अभिनंदन. “

तिसर्‍याने शेअर केले, “व्वा… हे आश्चर्यकारक आहे.” “अविश्वसनीय यश… आणि धोकादायक समुद्राच्या पाण्यात जवळजवळ 6 तास पोहल्यानंतर त्यांच्यात असलेली ऊर्जा.

मानवी शरीर आणि मन काय सहन करू शकते हे पाहून आश्चर्यचकित झाले…,” चौथ्याने व्यक्त केले.

मनाची शक्ती दर्शविण्याचा केला प्रयत्न

नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये भारतीय जलतरण संस्थेच्या अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेदरम्यान प्रकाश यांनी पोहण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले

“मी जास्त सराव न करता सर्वात लांब पोहण्याचा हा पल्ला गाठला होते. मी अत्यंत आनंदी आहे. कल्पना अशी होती की, एखाद्याच्या मनाची शक्ती दर्शविणे, जी अशा सहनशक्तीच्या घटनांमध्ये त्याच्या जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत ढकलली जाऊ शकते. ही माझी आवड आहे आणि मी माझ्या पूर्ण ताकदीने ते करतो,” अशी प्रतिक्रिया प्रकाश यांनी इंडियन एक्सप्रेसला एका खास संवादामध्ये दिली आहे.

पोहताना घेतली होती खबरदारी

प्रकाश यांनी असेही सांगितले की, त्यांच्याकडे अधिकारी आणि उपकरणे असलेल्या तीन सेफ्टी बोट्स आहेत ज्या खबरदारीचा उपाय म्हणून पोहताना एक माझ्या पुढे, एक मागे आणि एक बाजूला होती

झारखंडच्या हजारीबागमध्ये पहिल्यांदा पोहायला शिकले कृष्णा प्रकाश

. प्रकाश यांनी झारखंडच्या हजारीबागमध्ये 10-11 वर्षांच्या वयात प्रथम पोहायला शिकले होते. 52 वर्षीय प्रकाशने सांगितले. “मी हजारीबाग कॅनरीमध्ये पोहायचो, त्यामुळे खुल्या पाण्यात पोहण्याचे धाडस स्वाभाविकपणे येते. तसेच प्रत्येकाने पोहणे शिकले पाहिजे. यामुळे अनेकांचे जीव वाचतात,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 15:21 IST

संबंधित बातम्या