लग्न समारंभाआधी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. साखरपुडा, प्री वेडिंग शूट, संगीत, मेंदी, हळद आदी अनेक कार्यक्रम अगदी उत्साहानं पार पाडले जातात. लग्न ठरलेलं जोडपं लग्नाआधी विविध ठिकाणी जाऊन, अनोख्या थीमवर खास कपडे परिधान करून फोटोज काढतात; त्यालाच ‘प्री-वेडिंग शूट’ (Pre Wedding Shoot), असं म्हणतात. ‘प्री-वेडिंग शूट’ अनेक तरुणांची पहिली पसंती आहे. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. लग्न ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचं खास ‘प्री-वेडिंग शूट’ सध्या व्हायरल होत आहे आणि तो चर्चेचा विषय बनला आहे.
हैदराबादमधील एका जोडप्याचं प्री-वेडिंग शूट व्हायरल झालं आहे. हे जोडपं दोन पोलिस अधिकारी आहेत. तसेच प्री-वेडिंग शूटसाठी त्यांनी पोलिसांच्या गणवेश आणि अधिकृत वाहनाचा वापर व्हिडीओत केला आहे. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, सुरुवातीला महिला अधिकारी तिच्या पोलिसांच्या अधिकृत वाहनामधून गणवेश घालून बाहेर येते आणि चौकीतील इतरांशी संवाद साधत असते. तितक्यात पोलिसांची दुसरी अधिकृत गाडी येते आणि त्यातून @ravurikishore या अधिकाऱ्याची गणवेश घालून एंट्री होते आणि अधिकारी बघता क्षणी त्या महिला अधिकारीच्या प्रेमात पडतो. मग त्यांची लव्ह स्टोरी सुरू होते. या जोडप्याला विविध ठिकाणी डान्स करताना आणि काही सुंदर क्षण घालवताना या ‘प्री-वेडिंग शूट’मध्ये दाखवण्यात आलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांचं खास प्री-वेडिंग शूट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.




हेही वाचा… “२ किलोत तुमचं इमान..”, गणपतीआधी वाटलेल्या ‘आनंदाचा शिधा’च्या पिशवीवर मुस्लिम व्यक्तीची टीका; होतंय कौतुक\
व्हिडीओ नक्की बघा :
आयपीएस अधिकारी सी. व्ही. आनंद यांची प्रतिक्रिया :
हैदराबादमधील दोन पोलिस अधिकारी जोडप्याचं प्री-वेडिंग शूट पाहून आयपीएस अधिकारी सी. व्ही. आनंद यांनी पुढीलप्रमाणे आपलं मत मांडलं आहे. त्यांनी लिहिलं की, मी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, ते त्यांच्या लग्नाबद्दल थोडे जास्त उत्साही आहेत, असं दिसतं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. पण, थोडी लाजिरवाणीसुद्धा आहे. पोलिस खात्याचं काम खूप कठीण आहे; विशेषतः स्त्रियांसाठी. अशातच या विभागात महिलेला जोडीदार मिळणं हा आपल्या सर्वांसाठी आनंद साजरा करण्याचा एक प्रसंग आहे.
तसेच गणवेश आणि अधिकृत वाहनांचा वापर केल्याबद्दल त्यांनी पुढीलप्रमाणे मत मांडलं आहे. आयपीएस अधिकारी आनंद म्हणाले की, हे दोन पोलिस अधिकारी आहेत. मला पोलिस खात्याची मालमत्ता आणि गणवेश वापरण्यात काहीही गैर वाटत नाही. त्यांनी आम्हाला आधी कळवलं असतं, तर आम्ही शूटसाठी नक्कीच संमती दिली असती. आपल्यापैकी काहींना राग वाटू शकतो; परंतु मला त्यांच्या लग्नासाठी आमंत्रित केलं नसलं तरी त्यांना भेटून त्यांना आशीर्वाद दिल्यासारखं वाटतं. अर्थात, मी इतरांना सल्ला देतो की, योग्य परवानगीशिवाय याची पुनरावृत्ती करू नका, असं स्पष्ट मत मांडलं आहे.
लग्नबंधनात अडकलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ @CvanandIps यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेक जण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. तर, काही जण लग्नबंधनात अडकलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसून आले आहेत. तसेच ‘अशा पद्धतीनं प्री वेडिंग शूट करताना परवानगी घ्यावी’ या मताचं अनेकांकडून कमेंटमध्ये कौतुक होत आहे.