Iranian attack on Dubai International Airport Viral Video : ‘लाइटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला. इराणने दुबईवर हल्ला केल्याचा दावा या व्हिडीओद्वारे केला जात होता. व्हिडीओमध्ये एका इमारतीतून आगीच्या भीषण ज्वाळा निघताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इराणने अलीकडेच दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्याचा असल्याचे युजर्स सांगत आहेत. तपासादरम्यान आम्हाला असे आढळले की, शेअर केला जाणारा हा व्हिडीओ जुना असून, तो एका वेगळ्या घटनेचा आहे. त्याचा सध्याच्या परिस्थितीशी संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
@NiharNath01 या एक्स (ट्विटर) युजरने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला होता.
इतर युजर्सदेखील याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…
तपास…
आम्ही व्हायरल व्हिडीओमधील की-फ्रेम्सवर ‘रिव्हर्स इमेज सर्च’ करून तपास सुरू केला.
व्हिज्युअल मॅच शोधत असताना आम्हाला ६ ऑगस्ट २०२० रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला. त्यातील दृश्ये व्हायरल व्हिडीओसारखीच होती.
कॅप्शन : ‘UAE च्या अजमानमधील फळ आणि भाजी मार्केटला बुधवारी भीषण आग लागली.’
यावरून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडीओ २०२० मधील असून, दुबई विमानतळाचा नाही.
आम्हाला फेसबुकवरदेखील असेच व्हिडीओ आढळले, ज्यात ही घटना ‘अजमान’मधील असल्याचे नमूद केले होते.
https://www.facebook.com/reel/897448214071740
https://www.facebook.com/reel/298796514724676
अजमान हे संयुक्त अरब अमिरातीमधील एक शहर आहे.
गूगल कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला ‘रॉयटर्स’च्या (Reuters) वेबसाईटवर एक लेख सापडला :
https://www.reuters.com/article/us-emirates-blaze-idUSKCN2512JS
वृत्तानुसार
संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान येथील एका मार्केटमध्ये बुधवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आग आटोक्यात आणण्यात आली. अजमानचे पोलीस प्रमुख शेख सुलतान बिन अब्दुल्ला अल-नुआईमी यांनी सांगितले की, कोरोनाच्या निर्बंधांमुळे चार महिने बंद असलेल्या मार्केटचा काही भाग कोसळला आणि पूर्णपणे जळून खाक झाला.
तपासादरम्यान एका की-फ्रेममध्ये ‘सालेम शॉपिंग सेंटर’ (Salem Shopping Center) नावाचा बोर्ड दिसला. गूगल स्ट्रीट व्ह्यूवर शोधले असता, आम्हाला तेच ठिकाण सापडले.
https://maps.app.goo.gl/K3m1f52xPVjix7mK6
यावरून हे सिद्ध झाले की, व्हायरल व्हिडीओ इराणच्या हवाई हल्ल्याचा नाही. दरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा खरा व्हिडीओ खालील लिंकवर पाहता येईल, जो व्हायरल व्हिडीओपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे…
https://apnews.com/video/large-plume-of-black-smoke-billows-over-dubai-airport-after-drone-strike-hits-fuel-tank-7e909b88182444e6986a456ff59d1925
निष्कर्ष
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणने हल्ला केल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्रत्यक्षात २०२० मधील असून, तो अजमान, UAE येथील एका मार्केटला लागलेल्या आगीचा आहे. त्यामुळे हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.
