LPG Cylinder Crisis Cooking Hacks : अमेरिका, इराण, इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा मोठा परिणाम आता भारतात दिसून येतोय. देशातील अनेक भागात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झालाय. अशा परिस्थितीत अनेक हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांवर आता हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठीही लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. दरम्यान सोशल मीडियावरही गॅस सिलिंडर तुटवड्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होतायत. ज्यामध्ये लोकांनी गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून विविध जुगाड शोधून काढलेत.
कोणी चुलीवर तर कोणी इंडक्शनवर जेवन बनवताना दिसतयं, तर काहींनी जेवण बनवण्यासाठी असा काही जुगाड केलाय ज्याचा तुम्ही विचारच केला नसेल.

हॉटेलमध्ये चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक गॅस सिलिंडरऐवजी चुलीवर जेवण बनवताना दिसतायत. अनेक हॉटेल मालकांनी आता चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केलीय, विटा, रेती, सिमेंट माती वापरुन या चुली बनवल्या जात आहेत. खालील व्हिडिओमध्ये लखनौमधील एक हॉटेल व्यावसायिकाने गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल बंद न ठेवला चुलीवर जेवण बनवण्याचा पर्याय निवडला आहे.
कामगारांनीही घेतला चुलीचा आधार
एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, काही कंपनीमध्ये काम करणारे कामगार गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करत आहेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता, कामगारांनी जेवण बनवण्यासाठी चक्क एका रांगेत अनेक चुली पेटवल्या आहेत, हा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इस्त्रीवर बनवला चहा
याशिवाय लोक वेगवेगळे भन्नाट प्रयोग करताना दिसताय. या व्हिडीओत एका व्यक्तीने तर चक्क इस्त्रीवर चहा बनवण्याचा प्रयत्न केलाय, तर एका महिलेने चक्क इस्त्रीवर भाकरी बनवण्याचा प्रयत्न केलाय, अशाप्रकारे लोक संकटात जुगाड शोधताना दिसतायत.
इमर्शन रॉडने बनवली भाजी
एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, पाण्यात इमर्शन रॉड ठेवून अन्न शिजवले जात आहे. व्हिडिओमध्ये एका पातेल्यात भाजी फोडणीला टाकलीय, जिला आता इमर्शन रॉडच्या मदतीने गरम करुन उकळी काढली जातेय. लोक आता स्वयंपाकासाठी देखील इमर्शन रॉडचा वापर करताना दिसतायत.
एकाच कढईत एकाच वेळी बनवले तीन पदार्थ
व्हिडीओमध्ये एका तरुणाने एकाच कढईत एकाच वेळी चक्क तीन पदार्थ बनवून दाखवले आहेत. कढईत मळलेल्या पीठाच्या मदतीने त्याने तीन भाग करुन घेतलेत. एका भाजूला भात, दुसऱ्या बाजूला भाजी आणि तिसऱ्या बाजूला तो चक्क भजी तळताना दिसतोय,
अशाप्रकारे त्याने एकाच कढईत चक्क तीन वेगवेगळे पदार्थ बनवले. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे लोक अशा भन्नाट जुगाड करत जेवन बनवताना दिसतायत.
