scorecardresearch

Premium

रेल्वेच्या एसी कोचमध्ये झुरळांचा सुळसुळाट, संतापलेल्या प्रवाशाने Photo केला शेअर म्हणाला; स्वच्छता कुठे…

भारतीय रेल्वेच्या दिल्ली – तिरुपती ट्रेनच्या एसी कोचमध्ये झुरळांचा हैदोस पाहायला मिळाला. या झुरळांमुळे प्रवाशाला संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

irctc news nightmare indian railway passenger shares pic of cockroaches in on Delhi-Tirupati Express coach
रेल्वेच्या एसी कोचमध्ये झुरळांचा सुळसुळाट, संतापलेल्या प्रवाशाने Photo केला शेअर म्हणाला; स्वच्छता कुठे… (photo – Aatif Ali twitter)

दिल्लीहून तिरुपतीला निघालेल्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये झुरळांचा मुक्त संचाराने त्रस्त झालेल्या प्रवाशाला रात्र जागून काढावी लागली. एसी कोचमधील ही स्वच्छता आणि देखभालीमधील रेल्वेची उदासीनता पाहून प्रवाशाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रवाशाने आपल्या सीटभोवती झुरळ फिरत असल्याचा फोटो शेअर केला आहे.

ट्विटर यूजर अतीफ अलीने एसी कोचमध्ये झुरळ फिरत असल्याचा फोटो ट्विटरवर शेअर करत तक्रार केली आहे. ज्यावर भारतीय रेल्वे सेवेच्या अधिकृत हँडलने उत्तर दिले आहे.

17 railway stations in central western and harbour have facility of theft complaints
चोरीच्या तक्रारींसाठी केवळ १७ रेल्वे स्थानकांत सोय; पोलीस ठाण्यांबाहेर प्रवाशांच्या रांगा
mumbai-local
मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना पायपीट
Increase malfunction NMMT's electric buses Uran Passengers suffering buses are stopping on the road nmmc
उरण मध्ये एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बसच्या नादुरुस्तीत वाढ; भर रस्त्यात बस बंद होत असल्याने प्रवासी त्रस्त
non extension of trains
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; पश्चिम व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना…

गाडी क्रमांक १२७०८ A/C कोचमध्ये आम्ही झोपेत असताना आमच्या अंगावर झुरळं फिरत होती, कुठे आहे रेल्वेची स्वच्छता? असा सवाल आतीफ अलीने आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. त्याने एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यात बेडवर आणि ट्रेनच्या भिंतीवर झुरळ फिरताना दिसत आहेत.

हा फोटो ७ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला आहे. ज्याला आत्तापर्यंत २०० हून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेल्वे सेवेच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही त्याला उत्तर दिले आहे.

भारतीय रेल्वेने दिले असे उत्तर

रेल्वे सेवेने लिहिले की, “आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया प्रवासाचे तपशील (PNR/UTS No.) आणि मोबाईल क्रमांक आम्हाला DM द्वारे शेअर करा. तुम्ही तुमची समस्या थेट http://railmadad.indianrailways.gov.in वर देखील मांडू शकता. किंवा जलद निवारणासाठी 139 डायल करा.

रेल्वेची सर्वात वाईट अवस्था, युजर्सच्या प्रतिक्रिया

रेल्वे प्रवाशाच्या या ट्विटवर एका व्यक्तीने लिहिले की, तू लकी आहेस, मला कंपनी म्हणून उंदीर होते. यावरच दुसऱ्या एका युजरने लिहिले की, रेल्वेची अवस्था सर्वात वाईट आहे. हे कधीही पाहिले नाही. याशिवाय तिसऱ्या एका युजरने तुम्ही भारतीय रेल्वेच्या या एसी कोचमध्ये प्रवास करण्याचे धाडस कराल का? असा सवाल केला आहे. तर चौथ्या युजरने, हे एक भयानक स्वप्नासारखे आहे, असे म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Irctc news nightmare indian railway passenger shares pic of cockroaches in coach sjr

First published on: 08-08-2023 at 10:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×