Indian First time US travel experience : एका भारतीय प्रवाशाने आपल्या पहिल्या अमेरिका प्रवासातील अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. त्याने अमेरिकेतील प्रचंड आर्थिक प्रगती, मोठे रस्ते आणि उत्तम पायाभूत सुविधांचे कौतुक केले. मात्र, त्याच वेळी तिथे वावरताना त्याला भारतातील काही गोष्टींची खूप आठवण झाली, या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ..
‘भारतीय संस्कृती अमेरिकेपेक्षा श्रेष्ठ’
पोस्टमध्ये अरुणने लिहिले, “मी पहिल्यांदाच एका आठवड्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. तिथे गेल्यावर मला दोन गोष्टी प्रकर्षाने समजल्या. पहिली म्हणजे ही जागा खरोखरच कौतुकास पात्र आहे. मोठे रस्ते, चालण्यासाठी उत्तम फूटपाथ आणि विकासाचा प्रचंड वेग खरोखरच थक्क करणारा आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे, एअरपोर्टवर लोक तिथे भारतासारखी आपुलकीने मदत करत नाहीत.”
त्याने पुढे लिहिले की, भारताला विकासाच्या बाबतीत अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. शॉपिंगबद्दल बोलताना त्याने सांगितले की, कपडे, शूज आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अमेरिकेत बजेटमध्ये मिळतात. ‘रॉस’ सारख्या डिस्काउंट स्टोअरमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश किंवा व्हिएतनाममध्ये बनवलेले चांगले कपडे आणि शूज स्वस्त दरात उपलब्ध होतात. याशिवाय आयफोनही भारताच्या तुलनेत तिथे सुमारे २० टक्के स्वस्त मिळतात.
एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) अरुण नावाच्या युझरची ही पोस्ट आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे, त्याने एक्सवर @arunv2808 या हँडलवरून हा अनुभव शेअर केला आहे.
अनेक भारतीयांना येतो असा अनुभव
पहिल्यांदाच परदेशात जाणाऱ्या अनेक भारतीयांच्या भावनांना हा अनुभव स्पर्श करतो. अमेरिकेतील मोठे रस्ते, नीटनेटके फूटपाथ, स्वच्छ वातावरण आणि विकासाचा वेग नेहमीच आकर्षित करतो. मात्र, एअरपोर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणी मदत मागितल्यावर मिळणारी वागणूक भारतापेक्षा खूप वेगळी असते. भारतात अनोळखी व्यक्तीसुद्धा रस्ता दाखवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी लगेच पुढे येते, जे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.
युझर्सच्या प्रतिक्रिया
या पोस्टमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील फरकावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. एका युझरने लिहिले, “तुम्ही अमेरिकेत कुठे गेला होता? त्यावर हे अवलंबून असते. आपल्या देशातही विकासाची मोठी क्षमता आहे, फक्त अंमलबजावणी नीट होणे गरजेचे आहे.”
दुसऱ्या युझरने म्हटले, “अमेरिकेच्या पहिल्या प्रवासाआधी मी इतर देशांत गेलो होतो. मला अमेरिकेत इतर देशांच्या तुलनेत पायाभूत सुविधा काहीशा निराशाजनक वाटल्या.” तर तिसऱ्या युझरने लिहिले, “भारताबाहेर लोक माहिती मिळवण्यासाठी अज्ञातांवर अवलंबून न राहता तंत्रज्ञान, मॅप्स आणि AI चा वापर करतात.”
