scorecardresearch

हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हुबेहूब प्राण्यांसारखी दिसणारी प्रतिमा क्षणात बदलते अन…

हे प्राणी आहेत की माणसं? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Viral Video
आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर उत्तम कौशल्य दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर जंगलाप्रमाणे वातावरणात निर्मिती करण्यात आल्याचे दिसत आहे. या जंगलामध्ये काही प्राणी आणि पक्षीही दिसत आहेत. पण हे प्राणी, पक्षी नसुन काही कलाकारांनी हे रूप साकारलेले आहे.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एका ‘टॅलेंट हंट शो’मधील आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला एक घुबड स्टेजवर बसलेले दिसत आहे. पण काही सेकंदातच हे घुबड नसुन एका माणसाने हे रूप साकारले आहे, हे स्पष्ट होते, अशाप्रकारे अनेक प्राणी या स्टेजवर हुबेहुब साकारण्यात आले आहेत. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: कुत्र्याला जेवू घालण्यासाठी नवरीने चक्क…; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video पाहिलात का?

व्हायरल व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी कमेंट करत या कौशल्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 14:24 IST

संबंधित बातम्या