scorecardresearch

शेळी आहे की अस्वल? सर्वांना बुचकळ्यात टाकणारा Viral Video एकदा पाहाच

Viral Video: व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शेळी आहे की अस्वल? नेटकऱ्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येतय का पाहा

शेळी आहे की अस्वल? सर्वांना बुचकळ्यात टाकणारा Viral Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर सध्या एक बुचकळ्यात टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अस्वलासारखा दिसणारा प्राणी दिसत आहे, पण तो मुळात अस्वल नसून शेळी असल्याचे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे. पण त्याच्या मोठ्या आकारावरून ती शेळी आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. नेमकी ही शेळी आहे की अस्वल याबाबत नेटकऱ्यांनाही संभ्रम निर्माण झाला आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्विटरवर ‘Oddly Terrifying’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी अस्वल नसुन शेळी असल्याचे त्या शेळीच्या शिंगावरून स्पष्ट होते. यासह व्हिडीओ कॅप्शनमध्येही याचा खुलासा करण्यात आला आहे. ‘माउंटन गोट’ असा उल्लेख कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा: ट्रेकिंग करताना उंचावरून तोल गेला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: गरीब मुलांना दुकानाबाहेर रोज टीव्ही पाहत असलेले पाहून दुकानदाराने केलेली कृती होतेय Viral

या व्हिडीओने सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. इतकी मोठी शेळी पाहून नेटकरी यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडीओला १५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 19:56 IST

संबंधित बातम्या