बायकोचा वाढदिवस विसरणे ही ब-याच नव-यांची समस्या असते. आपण वाढदिवस विसरणार मग ती रागवणार, मग तिची मनधरणी करण्यासाठी तिला महागडी आणि तिची आवडती भेटवस्तू दिली की आपल्यासाठी विषयच संपतो. साधरण बायकोचा वाढदिवस विसरल्यानंतर तिच्या रागापासून सुटका करण्यासाठी सगळ्या नव-यांना गवसलेला हा साधा, सोपा पण १०१ टक्के काम करणारा मार्ग आहे. पण तुम्ही ‘सामोआ’ देशाचे नागरिक असाल तर मात्र तुम्हाला आपल्या पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे, कारण येथे पत्नीचा वाढदिवस विसरणे म्हणजे  कायद्याने गुन्हा आहे.

वाचा : खबरदार! क्रूर हुकूमशहा किम जाँग उनला ‘लठ्ठ’ म्हणाल तर..

हावाई आणि न्यूझीलँडच्यामध्ये सामोओ हा छोटा बेटवजा देश आहे. या देशाची लोकसंख्या ही अगदी मोजकीच म्हणजे जेमतेम २ लाखांहूनही कमी आहे. पण या देशात हा विचित्र कायदा करण्यात आला आहे. आता हा कायदा करण्यामागचे कारण ऐकूनही तुम्हाला हसू येईल. वाढदिवस विसरणा-या नव-यावर रागात पत्नीकडून हल्ले झाले आहेत आणि अशा अनेक तक्रारी येथे आल्या आहेत. कदाचित हे आपल्यासारख्यांना विनोदी वाटेल पण हेच प्रमाण रोखण्यासाठी पत्नीचा वाढदिवस विसरणे येथे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे पत्नीशी पटो अगर ना पटो पण तिचा वाढदिवस तिच्या मनाप्रमाणे साजरा करणे आणि तिला भरभरून शुभेच्छा देणे बंधनकारक आहे. तेव्हा कायद्याच्या आणि जीवाच्या भयाने का होईना पती आपल्या पत्नीचा वाढदिवस लक्षात ठेवतोच.

वाचा : वृद्ध आई- वडिलांची जबाबदारी नाकरण्या-या मुलांना अशी दिली जाते शिक्षा