VIRAL VIDEO : बहिणीच्या सासरी आला होता…रात्रभर ओलीस ठेवून मारहाण केली आणि मग पहाटेच जबरदस्तीने लग्न लावून दिलं

एका अजब गजब लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. बहिणीच्या सासरी गेलेल्या या मुलाला त्याच्यासोबत पुढे जाऊन काय होणार आहे, याची साधी कल्पना सुद्धा नव्हती. जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण?

Funny-Bihar-Marriage-Video-Viral
(Photo: Facebook/ Utkarsh Kajal Singh)

सोशल मीडियाच्या जगात दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर सध्या एका अजब गजब लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील एक मुलगा त्याच्या बहिणीच्या सासरी छठ पुजेसाठी गेला होता. पण बहिणीच्या सासरी गेल्यानंतर त्याच्यासोबत पुढे असं काही होईल, याची कल्पना सुद्धा त्याला कदाचित आली नसेल. आधीच्या दिवशी एकटा गेलेला हा मुलगी बहिणी सासरी जाऊन दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने गळ्यात बांधलेल्या बायकोसोबत परतेल, याचा विचार सुद्धा त्याने केला नव्हता. हे सारं ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटले, पण ही घटना प्रत्यक्षात घडलीय. जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिहारमधील नालंदाचा असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमधील अजब गजब लग्नाची चर्चा सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. नालंदातील धानुकी गावात राहणारा नितीश कुमार आपल्या बहिणीच्या सासरी छठ पुजेसाठी गेला होता. छठ पुजेचा प्रसाद देऊन परतत असताना तिथल्या काही लोकांनी शस्त्राच्या जोरावर त्याचं सुरूवातीला अपहरण केलं. त्याला रात्रभर बांधून ठेवून बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पहाटेच त्याचं एका मुलीशी जबरदस्तीने लग्न लावून दिलं.

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. यामध्ये शेतातून जात असताना नितीशला लोकांच्या जमावाने बळजबरीने पकडून त्याला लग्नस्थळी नेत असल्याचं दिसून येत आहे. एका व्यक्तीने त्याचा शर्ट पकडला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने नितीशला मागून धरलंय. ज्या मुलीसोबत त्यांचं जबरदस्तीने लग्न लावून देणार आहेत ती वधूही त्याच्यासोबत चालत असल्याचे दिसून येत आहे. नंतर दोघांनी लग्न केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.

आणखी वाचा : विद्यार्थीनीने शिक्षिकेच्या कानशिलात लगावली; नंतर शिवीगाळ करू लागली; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळेत वर्गाबाहेर मस्ती करत होता, मग पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

या अजब गजब लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आश्चर्य होत आहेत. काही नेटकरी मंडळी या अजब गजब लग्नाचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी लोकांच्या अशा वागण्यावर नाराजी व्यक्त केलीय. काही युजर्सनी तर या व्हिडीओवर काही विनोदी कमेंट्स सुद्धा शेअर करण्यास सुरूवात केलीय. हा व्हिडीओ आतापर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने नेटिझन्स त्यावर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jabran shadi ka video dulha dulhan ka video funny marriage video viral video google trends trending video man got married forcibly in bihar nalanda omg video went viral prp

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या